Home राजकीय ‘ त्या ,निकालाचा दाखला देत शरद पवारांची कोंडी

‘ त्या ,निकालाचा दाखला देत शरद पवारांची कोंडी

1 second read
0
0
32

no images were found

‘ त्या ,निकालाचा दाखला देत शरद पवारांची कोंडी

 

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाचे नाव व निवडणूक चिन्हाच्या मालकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या सुनावणीत सोमवारी अजित पवार गटाकडून पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आरोपांचा भडिमार करण्यात आला. पवार आपले घर चालवल्याप्रमाणे व बेकायदा पद्धतीने पक्ष चालवतात, पक्षात लोकशाही नाही, पवारांची अध्यक्षपदी झालेली निवडच अवैध होती, याबरोबरच सर्वाधिक आमदारांची संख्या आपल्यामागे असल्याचे ठासून सांगताना पक्षही आपलाच असल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाच्या वकिलांनी केला. यापुढील सुनावणी नऊ नोव्हेंबरला होणार आहे.
इंदिरा गांधी यांच्या काळातील काँग्रेसमधील फुटीवेळच्या सादीक अली प्रकरणावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आणि पी. ए. संगमा यांच्या ‘राष्ट्रवादी’तील बंडखोरी प्रकरणाचा वारंवार संदर्भ सोमवारच्या सुनावणीत दिला गेला. संगमा यांनी यापूर्वी पवार यांची पक्षाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली होती. सत्तरच्या दशकातील सादिक अली खटल्यात आमदारांच्या संख्येला महत्त्व देण्यात आले होते. संगमा यांच्या बंडखोरीवेळी सर्वाधिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संख्या महत्त्वाची मानली गेली होती.
नीरज किशन कौल आणि मनिंदरसिंग यांनी अजित पवार गटातर्फे युक्तिवाद केला. शिवसेना पक्षफुटीच्या वेळच्या सुनावणीचाही दाखला देताना प्राथमिक सदस्यांच्या संख्येवर नव्हे, तर आमदार-खासदारांच्या संख्येवर पक्ष कुणाचा याचा निर्णय द्यावा, असा जोरदार युक्तिवाद त्यांनी केला. आयोगाने त्या वेळी एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेचे नाव व चिन्ह देताना हाच फॉर्म्युला वापरला होता याची आठवण करून देताना, अजित पवार गटाने आयोगासमोरही एका प्रकारे धर्मसंकट उभे केल्याचे मानले जाते. ‘राष्ट्रवादी’तील सर्वाधिक आमदार आपल्यामागे असल्याचा दावा करताना अजित पवार गटाकडून त्याआधारे पक्षाचे चिन्ह आपल्यालाच मिळावे, अशी मागणीही करण्यात आली. आमच्याकडे एक लाखापेक्षा जास्त, तर शरद पवारांकडे ४० हजार शपथपत्रे आहेत, असा दावाही या गटाने केला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…