no images were found
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत विविध योजना
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत ऑफलाईन पध्दतीने थेट कर्ज योजना, २० टक्के बीज भांडवल योजना आणि ऑनलाईन पध्दतीने वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण योजना राबविण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य इतर मागावर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एन. व्ही. नार्वेकर यांनी दिली आहे.
जिल्हा कार्यालयात प्राप्त कर्ज प्रस्तावातील लाभार्थीची निवड करण्यासाठी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा लाभार्थी निवड समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीला समिती सदस्य व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये महामंडळाच्या वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेतील ३२ कर्जप्रस्तावांना व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेतील ४ कर्ज प्रस्तावांना अशा एकुण ३६ कर्ज प्रस्तावांना निवड समितीकडून मान्यता देण्यात आली.
जिल्ह्यातील गरजू व होतकरु इतर मागासवर्गीय व्यक्तींना महामंडळाच्या योजनांचा लाभ देण्यात आलेला आहे. इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) ज्या व्यक्तींना महामंडळाच्या योजनांचा विविध (ऑफ लाईन) योजनांचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला व आधार कार्ड यांची प्रत सोबत घेवून संबंधित अर्जदारांनी महामंडळाचे जिल्हा कार्यालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, कावळा नाका (ताराराणी चौकाजवळ), कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक ०२३१-२६५३५१२ येथे संपर्क करावा. तसेच ऑनलाईन कर्ज योजनांचा लाभ घेण्यासाठी महामंडळाचे संकेतस्थळ www.msobcfdc.org अर्जांची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, श्री. नार्वेकर यांनी केले आहे.