
no images were found
भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठतर्फे आयोजन केलेल्या गौरी सजावट स्पर्धेत स्नेहा गोंदकर प्रथम.
कोल्हापूर ( प्रतिनीधी ) : भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ कोल्हापूर महानगरतर्फे घेण्यात आलेल्या गौरी सजावट २०२३ या स्पर्धेत स्नेहा गोंदकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. भारतीय जनता पक्षाच्या नागाळा पार्क येथे बक्षीस वितरण संमारंभ पार पडला. भाजप महिला आघाडीच्या नेत्या व गोकुळ दुध संघाच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या स्पर्धेतील विजेत्यांना हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
स्पर्धेमध्ये द्वतीय क्रमांक संयोगिता धनवडे, तृतीय क्रमांक गौरी कारंजकर व उत्तेजनार्थ क्रमांक प्रतिक्षा मिरजकर यांना देण्यात आला. यावेळी गुढी सजावट स्पर्धेतीचे बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये प्रथमेश व रसिका साळवी, द्वितीय क्रमांक राधेश्याम सारडा, तृतीय क्रमांक प्रफुल्लता मंगेश बिडकर यांनी मिळवले.
भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठच्या गायक कलाकारांनी कराओकेवर भावगीते व भक्तगीते सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. सुत्रसंचलन सुप्रिती काकडे यांनी केले. श्वेता कुलकर्णी यांनी आभार मानले. स्पर्धा प्रमुख म्हणून मानसी गुळवणी म्हणून काम पाहिले. भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठचे जिल्हा संयोजक सतीश आंबर्डेकर, महानगर संयोजक महेश सोनुले, प्रसाद कुलकर्णी, देविदास सबनीस, नंदू बेलवलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.