
no images were found
तरूणांमध्ये हृदयसंबंधित आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात
इंडस हेल्थ प्लस या प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेमधील अग्रणी कंपनीने आरोग्यसेवा तपासण्यांच्या आधारावर हृदयाच्या आरोग्याशी संबंधित ट्रेण्ड्सचे निरीक्षण केले आहे. २०२१ ते २०२३ दरम्यान करण्यात आलेल्या आरोग्य तपासण्यांच्या निरीक्षणामधून निदर्शनास येते की, एकूण तपासणी करण्यात आलेल्या व्यक्तींपैकी १३ टक्के व्यक्तींनी अॅब्नॉर्मल स्ट्रेस टेस्ट्स केल्या, २९ टक्के व्यक्तींनी अॅब्नॉर्मल ईसीजी केले आणि ३० टक्के व्यक्तींनी अॅब्नॉर्मल २डी-इको चाचण्या केल्या. याव्यतिरिक्त, कोलेस्ट्रॉलसंदर्भात चाचण्या केलेल्या व्यक्तींपैकी ७१ टक्के व्यक्तींमध्ये अॅब्नॉर्मल एलडीएल (बॅड कोलेस्ट्रॉल) पातळ्या असल्याचे निदर्शनास आले.
एलडीएल लेव्हल, ईसीजी, सीटी कॅल्शियम स्कोअर, सीटी कोरोनरी एंजियोग्राफी आणि कार्डियोव्हॅस्कुलर स्थितीच्या मूल्यांकनासाठी स्ट्रेस टेस्ट अशा चाचण्या करण्यात आल्या. या संशोधनामध्ये विविध वयोगटातील जवळपास २५,००० व्यक्तींचा समावेश होता.
आरोग्य तपासणी डेटाबाबत आपले मत व्यक्त करत इंडस हेल्थ प्लसचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक व प्रीव्हेन्टिव्ह हेल्थकेअर स्पेशालिस्ट श्री. अमोल नाईकवडी म्हणाले, ”सखोल निरीक्षणामधून आमच्या निदर्शनास आले की, धूम्रपान करणाऱ्या ७१ टक्के व्यक्तींमध्ये त्यांच्या आरोग्य तपासणीदरम्यान अधिक प्रमाणात एलडीएल (बॅड कोलेस्ट्रॉल) पातळ्या होत्या. आमच्या निदर्शनास आले की, ही टक्केवारी धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत सर्वाधिक आहे. तसेच ३९ टक्के लठ्ठ व्यक्तींच्या ईसीजी निष्पत्ती अॅब्नॉर्मल होत्या, ज्यामधून जीवनशैली व हृदयाचे आरोग्य यांमधील महत्त्वाचे संबंध दिसून आले. तसेच आमच्या निदर्शनास आले की, तरूणांना (पुरूष व महिला) देखील हृदयविषयक आजार होण्याचा उच्च धोका होता.”
जागतिक हृदय दिन आपल्याला आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव – हृदयाची काळजी घेण्याचे आवाहन करतो. फक्त जागरूकता पुरेसी नाही, तर योग्य वेळी आवश्यक उपाय करण्यासाठी जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. हृदयविषयक आजारावर प्रतिबंध ठेवण्यासाठी हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे, आरोग्यदायी आहाराच्या सेवनासह उत्तम पेाषण आणि नियमित व्यायाम अशा उत्तम सवयींचे पालन केले पाहिजे. आपल्या सहयोगात्मक संकल्पासह आपण हृदयाच्या आरोग्याची उत्तम काळजी घेऊ शकतो. जागतिक हृदय दिनानिमित्त, चला फक्त जागरूकता नाही, तर कृती करण्याचे वचन घेऊया, ज्यामुळे हृदयविषयक आजारावर प्रतिबंध ठेवण्यासह आपल्या स्वत:साठी, तसेच भावी पिढ्यांसाठी आरोग्यदायी, दीर्घकालीन व अधिक उत्साहपूर्ण भविष्याची रचना करू. भविष्यात हृदयाचे आरोग्य उत्तम असण्यासाठी आतापासूनच हृदयाच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्राधान्य द्या.”
तसेच, इंडस हेल्थ प्लसने जवळपास १०,००० व्यक्तींचे अनुवांशिक संशोधन देखील केले, जेथे २४ टक्के व्यक्तींना कोरोनरी आर्टरी डीसीज (सीएडी)चा उच्च अनुवांशिक धोका असल्याचे, तसेच ३० टक्के व्यक्तींच्या एलडीएल पातळ्यांमध्ये वाढ होण्याची मोठी शक्यता असल्याचे निदर्शनास आले, यामधून सीएडीचा वाढता धोका दिसून आला. हे पाहता कंपनीने प्री-एम्प्टिव्ह जेनेटिक स्क्रिनिंग आणि प्रतिबंधात्मक आरोग्य तपासण्यांना अधिक प्राधान्य दिले आहे, ज्यामुळे वैयक्तिक धोके ओळखता येऊ शकतात, हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी वैयक्तिकृत धोरणांसंदर्भात मार्गदर्शन करता येऊ शकते. हे तुमच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे साधन आहे.