
no images were found
मोटारसायकलसह जबरी चोरी करणाऱ्या दोघा भावांना अटक
कोल्हापूर; ( प्रतिनिधी )
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणाऱ्या दोघा भावांना शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. “अशरफअली शेरअली नगारजी” वय १९ आणि “सैफअली शेरअली नगरजी” वय २३ (रा. दर्गा गल्ली निपाणी जिल्हा-बेळगाव) अशी आरोपींची नावे आहेत.त्यांच्याजवळून चोरीच्या सुमारे १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या ५ मोटारसायकली आणि जबरी चोरीतील २ लाख रुपये किमतीचे दागिने असा एकुण ३ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अशी माहिती शहर डी वाय एस पी अजित टीके यांनी दिली आहे.
कोल्हापूर जिल्हयात गेल्या काही दिवसापासुन मोटारसायकल चोरी तसेच महिलांच्या गळयातील सोनसाखळी चोरीच्या घटना घडलेल्या होत्या सदर घटनांच्या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शहरातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार आरोपींचा शोध घेत होते. सदरचे आरोपी हे परराज्यातील असावेत अशा संशय व्यक्त करुन शाहुपुरी पोलीसांनी तपास सरु केला.दरम्यान शाहुपुरी पोलीस ठाणेस गु.र.नं ८२६ / २०२३ भादविस क ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयाच्या तपासादरम्यान गोपनीय बातमी दारा मार्फत तसेच सदरबाजार परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मिळुन आलेल्या माहीतीमध्ये सदरचे आरोपी गुन्हयाचे कालवधीमध्ये कोल्हापूर शहरामध्ये वास्तव्यास होते याची खात्री झाली.पोलिसांनी संशयीत आरोपींचा शोध घेण्यास सुरवात केली. नमुद गुन्हयातील निष्पन्न संशयीत आरोपी हे कर्नाटक राज्यातील असुन याचेवर निपाणी टाउन पोलीस ठाणे गु.र.नं. ३३ / २०२२ भादवि कलम ३०२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समजले.
त्यांना सह आयुक्त चिकोडी जि. बेळगाव यांनी तडीपार केलेन होते. यातील आरोपी अशरफअली शेरअली नगारजी यास” रायलपाडु जि.कोलार कर्नाटक या पोलीसांत दैनंदिन हजेरी लावणेत आलेली होती तसचे आरोपी सैफअली शेरअली नगारजी यास हनुर पोलीस ठाणे जि. चामराजनगर राज्य कर्नाटक येथे हजेरी लावणेत आलेली होती. या दोन्ही सराईत गुन्हेगारांचा गुन्हयात सहभाग निष्पन्न झालेने शाहूपुरी पोलिसांनी सहायुक्त चिकोडी जिल्हा बेळगाव यांच्याशी पत्रव्यवहार करून निपाणी येथून अटक केली.त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी कोल्हापूर व जिल्ह्यामध्ये मोटारसायकल चोरी आणि जबरी चोरी केल्याची कबुली दिली.यामध्ये शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये ३ गुन्हे, राजारामपुरी पोलीस ठाण्यात १ गुन्हा, तसेच कर्नाटक राज्यात १ असे मोटार सायकलचे गुन्हे दाखल आहेत. शाहूपुरी पोलिसांनी १लाख ३० हजार रुपये किमतीच्या पाचही मोटरसायकली जप्त केल्या आहेत. तर कुरुंदवाड पोलीस ठाणे, शिरोळ पोलीस ठाणे, कागल पोलीस ठाणे,शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे ,जयसिंगपूर पोलिस ठाणे, या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील २ लाख रुपये किमतीचे दागिनेही हस्तगत केले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अजित टिके यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अजय सिंदकर, पोसई प्रमोद चव्हाण, सहाय्यक फौजदार संदीप जाधव, पोलीस हवालदार संजय जाधव, मिलींद बांगर, लखनसिंह पाटील, शुभम संकपाळ, बाबासाहेब ढाकणे, रवी आंबेरक, विकास चौगुले, महेश पाटील, विरेंद्र वडेर
यांनी केली आहे.