no images were found
शिक्षण केंद्रामार्फत दि.27 सप्टेंबर रोजी एम.बी.ए. फेर प्रवेश परीक्षेचे आयोजन
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रामार्फत एम.बी.ए. (डिस्टन्स मोड) या अभ्यासक्रमासाठी चालू शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी विद्यापीठाने घेतलेल्या प्रवेश परीक्षेनुसार विध्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया झालेली आहे,तथापि विद्यार्थी हितास्तव फेर प्रवेश परीक्षेचे आयोजन केले असून त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन संचालक प्रा.डॉ. डी. के. मोरे यांनी दिली.
प्रा.डॉ. मोरे म्हणाले की,एम.बी.ए. अभ्यासक्रमासाठी विद्यापीठ अनुदान आयोग व अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद यांची मान्यता आहे.त्यामुळे विद्यार्थीना मार्केटिंग, मानव संसाधन व्यवस्थापन, ऑपरेशन आणि प्रोडक्शन व्यवस्थापन, इंटरनॅशनल बिझनेस तसेच वित्तीय व्यवस्थापन या विषयातून एम.बी.ए. (डिस्टन्स मोड) पूर्ण करता येणार आहे. विद्यार्थी,नोकरदार, गृहिणी, उद्योजक, व्यवसायिक इत्यादी या अभ्यासक्रमासाठी प्रवेशित होऊ शकतात.
तरी ज्या विद्यार्थ्यांना एम.बी. ए. साठी प्रवेश निश्चित करायचा आहे. अशा विद्यार्थ्यांनी बुधवार दि.27 सप्टेंबर पर्यंत दुपारी 12 वाजेपर्यंत प्रवेश परीक्षा अर्ज https://sukapps.unishivaji.ac.in/pgentrance/#/login या लिंकवर भरावेत व त्याच दिवशी दि.27 सप्टेंबरला दुपारी 3 ते 4:30 या वेळेत दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र येथे प्रवेश परीक्षेसाठी उपस्थित राहावे. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एम.बी.ए. (डिस्टन्स मोड) प्रवेश परीक्षेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा,असे आवाहन संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनी केले आहे.