
no images were found
यंदा कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती आवश्यक तेथे पाणी पुरवठा करण्याच्या सुचना
धुळे :- धुळे जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. धुळे तालुक्यातील संभाव्य पाणी आणि चारा टंचाईवर चर्चा करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी धुळे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस जि.प. अध्यक्षा अश्विनीताई पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती, विविध विभागांचे अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच 38 खेड्यातील सरपंच, ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते. या बैठकीत खासदार भामरे यांनी पाणी टंचाई लक्षात घेवून आवश्यक तेथे टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या सुचना दिल्या.