
no images were found
गोवा येथील गोवा हिंदी अकादमी आणि विद्यार्थी विकास अकादमी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापुरात गुरुवंदना राष्ट्र भूषण संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्ष अनुराधा अर्बन निधी बँक गडहिंग्लजचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर हनुमंत शिरगुप्पे उपस्थित होते. संमेलनाचे उद्घाटन राज्यसभा खासदार माननीय धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोल्हापूर शहरातील सागर शेरखाने यांना शाहू महाराज उत्कृष्ट डिझायनर म्हणून पुरस्कार देण्यात आला. तसेच अन्य क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आयोजक प्राध्यापक डॉक्टर बी एन खरात यांनी कार्यक्रमाचे नियोजन उत्कृष्ट पद्धतीने केले होते .यावेळी गोवा हिंदी अकॅडमीचे अध्यक्ष माननीय सुनील शेठ, गोवा विधानसभेचे माजी उपसभापती माननीय शंभू भाऊ बांदेकर, इचलकरंजी येथील वेद फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर रजनीताई शिंदे ,शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉक्टर उत्तम सकट ,कणकवली येथील प्रसिद्ध उद्योजक सूर्यकांत सावंत आदी उपस्थित होते .शाहू स्मारक दसरा चौक कोल्हापूर येथे झालेल्या या संमेलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.