no images were found
“न्यू पॉलिटेक्निकमध्ये टू व्हीलर रिपेअर्स ॲन्ड मेन्टेनन्स कार्यशाळा”
उचगाव (प्रतिनिधी) :श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकच्या ऑटोमोबाईल विभागामध्ये टू व्हीलर रिपेअर्स ॲन्ड मेन्टेनन्स या सात दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) कोल्हापूरचे विभागीय अधिकारी सुदाम थोटे यांच्या हस्ते झाले.
यावेळी एमसीईडीच्या प्रकल्प अधिकारी वनिता पाटील, प्रा. संग्रामसिंह पाटील, प्रा. नितीन पाटील, प्रा. अभिजीत वालवडकर, विभागप्रमुख, स्टाफ व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.ही कार्यशाळा न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल विभाग आणि एमसीईडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली आहे. यामध्ये जिल्ह्य़ातील तसेच कोकणातील टु व्हीलर मेकॅनिक्स आणि विद्यार्थी सहभागी आहेत.
“या कार्यशाळेत प्रशिक्षणार्थीना टू व्हीलरमधील अद्ययावत तंत्रज्ञान, रिपेअरी पद्धती, टूल्सचा वापर आणि त्याचबरोबर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठीचे मार्गदर्शन केले जाणार आहे”, असे कार्यशाळेचे समन्वयक प्रा. वैभव पाटणकर यांनी सांगितले.
“प्रशिक्षणार्थींना एमसीईडीचे प्रमाणपत्र मिळणार असल्याने त्यांना व्यवसाय सुरू करण्यास व विस्तार करण्यासाठी बॅंकेचे कर्ज व इतर अनुषंगिक सुविधा उपलब्ध होतील. प्रशिक्षणार्थींनी इथे मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग लोकांना उत्तम सेवा देण्यासाठी करावा”, असे सुदाम थोटे यांनी प्रतिपादन केले.सदर ट्रेनिंग आयोजनासाठी ऑटोमोबाईल विभागप्रमुख प्रा. सुहासचंद्र देशमुख यांनी परिश्रम घेतले. प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. कु. ऋतुजा पाटील यांनी सूत्रसंचालन केले आणि प्रा. रोहन देसाई यांनी आभार मानले.