no images were found
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन
कोल्हापूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत गोकुळ शिरगाव औद्योगिक क्षेत्र व कागल-हातकणंगले, गोकुळ-शिरगाव व शिरोली पाणी पुरवठा करणाऱ्या उदंचन केंद्र व जलशुध्दीकरण केंद्र येथील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 1 वाजता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कोल्हापूर विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल ढोरे यांनी दिली आहे.
कार्यक्रमास शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर प्रमुख उपस्थित असणार आहेत. तसेच खासदार सर्वश्री धनंजय महाडिक, संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार सर्वश्री सतेज पाटील, अरुण लाड, जयंत आसगांवकर, पी.एन.पाटील, ऋतुराज पाटील, श्रीमती जयश्री जाधव, मुंबई मऔविमचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा उपस्थित राहणार आहेत.