
no images were found
मिरजकर तिकटी व गंगावेश दुध कट्ट्याच्या सुशोभिकरणाच्या कामाचा शुभारंभ
कोल्हापूर : (प्रतिनिधी) छत्रपती महाराणी ताराराणी, राजर्षी शाहू महाराजांची कृपादृष्टी लाभलेले कोल्हापुर अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या काळात कोल्हापूरात कला, क्रीडा क्षेत्राचा विकास झाला. खासबाग मैदानात देश, परदेशातून आलेल्या मल्लांनी शड्डू ठोकले आणि कोल्हापुरात असणाऱ्या दुधकट्ट्यांवर दुध पिऊन आपली ताकत वाढविली. असे ऐतिहासिक दुध कट्टे आजही पिढ्यान पिढ्या लोकांची सेवा करण्याचे काम करत आहे. त्यांचे संवर्धन व्हावे, विकास व्हावा आणि यातून दुग्ध व्यावसायिकांना आर्थिक पाठबळ मिळावे या हेतून शहरातील दुध कट्ट्याचे संवर्धनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. आगामी काळात शहरातील अशा अनेक ऐतिहासिक जागांच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी विशेष निधी देवू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) सन २०२२- २३ अंतर्गत विभागीय कार्यालय क्र.२ अंतर्गत मिरजकर तिकटी आणि गंगावेश येथील दुधकट्टा विकसित करणेच्या कामास प्रत्येकी रु.२० लाख इतका निधी मंजूर झाला असून, या विकास कामाचे उद्घाटन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
यावेळी बोलताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष पदाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यासह शहराच्या विकासासाठी निधी मंजूर होत आहे. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी कोल्हापूरला दिला आहे. आपल्या पदाचा सकारात्मक वापर करून शहर व जिल्हा विकासाचे काम करत आहे. यात समाज हिताच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे. परंतु, स्वत: काही करायचे नाही आणि दुसऱ्याच्या कामात खोडा घालून जनतेत गैरसमज पसरविण्यांची कीव येत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून शहर विकासाच्या कामाकडे लक्ष देत असल्याचे सांगितले.
यावेळी माजी नगरसेवक अशोक पोवार यांनी, क्षीरसागर यांच्या कार्यपद्धतीमुळे राज्य नियोजन मंडळाचे काम जनतेला माहित झाले. यापूर्वी हे पद अस्तित्वात होते परंतु काय काम व्हायचे याची जनतेला कल्पना नव्हती. जिल्ह्यात अनेक आमदार, खासदार, मंत्री झाले परंतु अशा ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाचा विषय हातात घेणारे श्री.क्षीरसागर हे एकमेव लोकप्रतिनिधी असल्याचे सांगितले.
यावेळी शिवसेना महानगर समन्वयक जयवंत हारुगले, माजी नगरसेवक बाबा पार्टे, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, उपआयुक्त साधना पाटील, आर्कीटेक्ट रणजीत निकम, नारायण भोसले, दुग्ध व्यावसायिक संघटनेचे संजय पाटील करंबे, बाळकृष्ण चिले, राजेंद्र पाटील, पिंटू भोसले, युवराज बचाटे, सत्याप्पा गवळी, प्रताप आडगुळे, बाबुराव मोहिते, नंदू भोसले, अशोक राबाडे, बबन गवळी, शिवसेनेचे सचिन पाटील, रणजीत मंडलिक, क्रांतीकुमार पाटील, कुणाल शिंदे आदी उपस्थित होते.