Home क्राईम वीजेच्या खांबाला धडकून कारचा भीषण अपघात कारचे  अक्षरश: दोन तुकडे

वीजेच्या खांबाला धडकून कारचा भीषण अपघात कारचे  अक्षरश: दोन तुकडे

0 second read
0
0
100

no images were found

वीजेच्या खांबाला धडकून कारचा भीषण अपघात कारचे  अक्षरश: दोन तुकडे

मुंबईतील कुर्ला येथे भरधाव वेगाने धावणारी अर्टिगा कार वीजेच्या खांबाला धडकून रात्री हा भीषण अपघात झाला.

धडक इतकी जबरदस्त होती की, कारचे अक्षरश: दोन तुकडे झाले.अपघातात दोन तरुणींसह एकूण 5 जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री12 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ही कार चेंबूरच्या दिशेने जात होता. यावेळी ती प्रचंड वेगात होती. कार एससीएलआर ब्रीजवर पोहोचली असता चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार वीजेच्या खांबाला जाऊन धडकली. कारचा वेग इतका होता की, धडकेनंतर तिचा अक्षरश: चुराडा झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना कार खांबापासून वेगळी करण्यासाठी तब्बल 1 तास लागला. कार पूर्णपणे खांबात अडकली होती. यानंतर आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. त्यांना तात्काळ जवळच असणाऱ्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी एकूण 5 लोक प्रवास करत होते. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल!

विशेष लेख- / राष्ट्रीय एकता दिवस राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल! भारताच…