no images were found
गीतांजली मिश्राने भोपाळच्या लक्षवेधक तलावाच्या मोहकतेचा आनंद घेतला
एण्ड टीव्हीवरील घरेलू कॉमेडी ‘हप्पू की उलटन पलटन‘मध्ये नवीन राजेश सिंग (रज्जो)च्या भूमिकेत गीतांजली मिश्राच्या प्रवेशाने प्रेक्षकांमध्ये व्यापक उत्साह निर्माण केला आहे. अभिनेत्रीने ८ ते ९ ऑगस्टला मध्यप्रदेशची राजधानी भोपाळला भेट देत चाहत्यांना आनंदित केले. या ट्रिपदरम्यान तिने चाहत्यांसोबत चर्चा केली, ऐतिहासिक स्थळांना भेट दिली, अपर लेकवर बोटिंगचा आनंद घेतला आणि चौक बाजारमध्ये स्वादिष्ट पाककलांचा आस्वाद घेतला. आपला उत्साह व्यक्त करत राजेश सिंगची भूमिका साकारणाऱ्या गीतांजली मिश्रा म्हणाल्या,
”भोपाळमध्ये फेरफटकाचा मारण्याचा अनुभव उत्साहपूर्ण होता. लोकप्रिय ठिकाणी भेट देताना मालिका ‘हप्पू की उलटन पलटन‘च्या चाहत्यांसोबत हृदयस्पर्शी चर्चेने माझे मन भारावून गेले. राजेशची भूमिका सर्वत्र लोकप्रिय असल्यामुळे सर्वांकडून माझ्या नवीन मालिकेसाठी शुभेच्छा मिळाल्या. असा पाठिंबा पाहून माझा दिवस सार्थ ठरला. अनेकांनी दरोगा हप्पू सिंग जी बाबत देखील विचारपूस केली आणि मी मस्करीत प्रतिक्रिया दिली, ‘ते त्यांच्या पोलिस कर्तव्यांमध्ये व्यस्त आहेत‘ (हसते).” शहरामध्ये फेरफटका मारण्याबाबत सांगताना गीतांजली पुढे म्हणाल्या, ”भोपाळमधील तलावाची मोहकता माझ्यासाठी स्वर्गासारखा अनुभव आहे. तलावाच्या काळी डाल बफ्ता, गुलाब जामुन, मावा बाती व वारसायुक्त भोपाळी पान यांचा आस्वाद आल्हाददायी अनुभव होता. मी प्रत्येक वास्तू व ऐतिहासिक आभा पाहून भारावून गेले. चौक बाजारमध्ये मी चांदीची आभूषणे, मखमली पर्सेस खरेदी करण्याचा, तसेच हँडीक्राफ्ट खजिना व कालातील वारसाचा आनंद घेतला. पारंपारिक भोपाळी कला व भरतकाम केलेल्या कूशन्सनी माझे लक्ष वेधून घेतले. भोपाळप्रती असलेली माझी आवड अधिक पक्की झाली. प्रत्येक भेटीसह या स्थळाप्रती प्रेम अधिक वाढत आहे.”