
no images were found
रक्तदान शिबिरात २२१ रक्तदात्यांनी केले रक्तदान
गेल्या काही दिवसांपासून सीपीआर मध्ये अपुरा रक्तपुरवठा असून रक्तदानाचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करणेत आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि उर्जा मैत्री परिवार, कोल्हापूर यांचे वतीने क्रांतिदिनाचे चित्त साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल २२१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले. शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ सभागृहात हे शिबीर संपन्न झाले.
कोल्हापूरातील सीपीआर हे सामान्य रुग्णांसाठी हक्काचे रुग्णालय म्हणून ओळखले जाते. या रुग्णालयात कोल्हापूर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून अनेक आबालवृद्ध रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. या रुग्णालयातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. डेंग्यू रुग्णांना रक्तपुरवठा अधिक करावा लागत आहे. शिवाय रक्तदान शिबीरेही थंडावली आहेत. याचा परिणाम रुग्णसेवेवर होत असल्याचे सीपीआर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. हे वृत्त अनेक माध्यमांतून प्रकाशित झाले. यानंतर व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून सक्रिय असलेल्या ऊर्जा मैत्री परिवार या ग्रुपने रक्तदान शिबीर घेण्याचे ठरवले. शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाशी संपर्क साधून सदर शिबीराचे आयोजन केले गेले.
या शिबिरात शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी, कर्मचारी, वसतिगृहातील विद्यार्थी यांनी सहभागी होऊन रक्तदान केले. यात मुलींचाही उत्स्फूर्त सहभाग राहिला. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांनी रक्तदान शिबिरास भेट दिली. उर्जा मैत्री या ग्रुप मधील सर्व सदस्यांचे या विधायक कामाबद्दल कौतुक केले. यावेळी प्र. कुलगुरु प्रा. पी. एस. पाटील, प्र. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, डॉ. एम. एस. देशमुख, एनएसएस विभागाचे डॉ. चौगले, जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर आदी उपस्थित होते. या शिबीर आयोजनाबदल सीपीआर प्रशासनाच्या वतीने शिवाजी विद्यापीठ आणि उर्जा मैत्री परिवाराचे विशेष आभार मानले. सहभागी रक्तदात्यांना सीपीआर प्रशासनाच्या वतीने प्रमाणपत्र वितरित करणेत आले. या शिबीर यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. चौगले, सुनिल दळवी, दिग्विजय देसाई, मतीन शेख, विशाल पाटील, रणजीत कांबळे, प्रदीप बोभाटे, राजेश पाटील, राम चव्हाण, विश्वास पाटील, दया निकाडे, जयवंत भोसले, उत्तम पवार, दत्तात्रय कदम, अनंत गिरीगोसावी, सुशांत माळवी, सचिन लोंढे पाटील, अनिकेत पाटील, रोहित इंदुलकर, प्रदीप तानुगडे, अमर पाटील, मि. रजनी, संदीप नलवडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.