no images were found
आज चंद्र दिसणार इतर दिवसांपेक्षा काही पटीने मोठा
मुंबई : अवकाशात रोज अनेक घडामोडी घडत असतात. ग्रह तारे आणि नक्षत्रांच्या या जगात आज अद्भुत अशी घटना घडणार आहे. कारण 27 नक्षत्रांचा राजा असलेला चंद्र आज वेगळ्याच रुपात दिसणार आहे. इतर वेळी दर सव्वा दोन दिवसांनी राशी बदल करत कलेकलेने वाढणारा आणि कमी होणार चंद्र काही पटीने मोठा दिसणार आहे. ही घटना खगोलप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. ऑगस्ट महिना हा खास असणार आहे. कारण चंद्र या महिन्यात दोनदा अद्भुत अशा स्थितीत दिसणार आहे. म्हणजेच त्याचं स्वरुप इतर दिवसांपेक्षा वेगळं आणि मोठं असणार आहे. ही स्थिती या महिन्यात दोनदा अनुभवता येणार आहे. पहिला सुपरमून आज दिसणार आहे. आज पौर्णिमा असून आजचा चंद्र सर्वांचं लक्ष वेधून घेणारा असेल.
कधी पाहता येणार सुपरमून?
खगोलशास्त्रज्ञांच्या मते, आज पृथ्वीच्या चहु बाजूला चंद्राची कक्षा 5 डिग्री अंशात झुकलेली असेल. चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ येणार असल्याने इतर दिवसांपेक्षा मोठा दिसणार आहे. इतर दिवसांच्या तुलनेत चंद्र 14 टक्के मोठा आणि 30 टक्के अधिक चमकदार दिसतो. यामुळे आज दिसणाऱ्या चंद्राला स्टर्जन मून असं संबोधलं जातं. आज मध्यरात्री 12 वाजून 2 मिनिटांनी चंद्राचं मोठं रुप पाहायला मिळणार आहे