no images were found
उच्च गुणवत्ता धारकांचे डी वाय पाटील आभियांत्रिकीला प्राधान्य – डॉ गुप्ता
कोल्हापूर : अभियांत्रिकी प्रवेश 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी राज्य सीईती सेलची केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रवेश प्रक्रियेत एमएचटी-सीईटीमध्ये उच्च गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची डी. वाय. पाटील अभियांत्रीकीला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आणि जवळपासच्या कॉलेजांच्या तुलनेत टॉप रँकर्सनी आमच्या महाविद्यायाला पसंती दिल्याची महिती ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ ए के गुप्ता यांनी दिली.
ओपनिंग रँकबाबतच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता सध्या सर्वात जास्त मागणी असलेल्या बी.टेक. इन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग अभ्यासक्रमासाठी खुल्या प्रर्गातून या वर्षी 2041 (99.17) ओपनिंग रँक आहे. 2022 मध्ये याच श्रेणीमध्ये 2271 (98.63) रँक होता, असे त्यांनी सांगितले.
संस्थेमध्ये राबवल्या जाणाऱ्या आउट ऑफ बॉक्स उपक्रमांमुळे हे यश मिळाल्याचे सांगितले. डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने सर्वोच्च प्राधान्य असलेल्या विद्यालयांमध्ये आघाडीचे स्थान मिळवले आहे.संशोधन आणि तंत्रज्ञानातील उत्कृष्टतेबाबतची आमची वचनबद्धता यामुळे अधोरेखित झाली आहे. विद्यार्थ्यांना नवे शोध आणि नवकल्पना यासाठी संस्थेकडून नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे अधिक चांगल्या प्रतिभेच्या विद्यार्थीची महाविद्यायाल पसंती मिळत असल्याचे डॉ ए के गुप्ता यांनी सांगितले.
महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीवर भर दिला जातो. व्यक्तिमत्व विकास आणि विविध ट्रेनिंग तसेच ऑनलाईन इंटरव्यू बाबतही मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे यावर्षी सर्वाधिक प्लेसमेंट देणारे महाविद्यालय ठरले आहे. 2022 -23 या वर्षात तब्बल ६८० विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळाली असून महाविद्यालयाच्या अनामिका डकरे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक पॅकेज मिळवणारी विद्यार्थीनी ठरली आहे. तिला एडोबे कंपनीकडून 60 लाखाचे पॅकेज मिळाल्याची महिती त्यानी दिली.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.