no images were found
पत्रकारांना रु 20000 निवृत्ती वेतन लागू होणार- राजेश क्षीरसागर यांच्या मागणीला यश
कोल्हापूर : राज्यातील पत्रकारांना लवकरच निवृत्ती वेतन लागू होणार आहे.याबाबत तत्कालीन आमदार आणि सध्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जुलै 2017 मध्ये पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाचे लक्ष वेधले होते.
यासह तत्कालीन मंत्री
व प्रधान सचिव यांच्याकडे निवृत्ती वेतनासह राज्यातील पत्रकारांना टोल माफी मिळावी, अशी मागणी वेळोवेळी केली आहे. या मागणीच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.त्यानुसार लवकरच रु 20000 निवृत्ती वेतनाचा आदेश जारी होणार असल्याचे शासनाकडून कळविले आहे.त्यामुळे राजेश क्षीरसागर यांचे सर्व पत्रकार बांधवांकडून कौतुक केले जात आहे.
काही राज्यात पत्रकारांना निवृत्त्त्ती वेतन देत आहेत. कर्नाटक केरळ हरियाणा उत्तर प्रदेश अशा राज्यांत आठ ते दहा हजार असे मानधन चालू आहे.त्याचप्रमाणे तामिळनाडू मध्येही पेन्शन देण्याचे नियोजन चालू आहे. पण महाराष्ट्रात अद्याप पत्रकार यांच्या साठी काहीच नियोजन नाही. नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महाराष्ट्र विधानसभा सचिवालय यांना विनंती केली होती कि महाराष्ट्रात अशी कोणतीही योजना नसल्याने पत्रकारांमध्ये असंतोष आहे.पत्रकारांना बातम्या गोळा करण्यासाठी ग्रामीण,जिल्हा तसेच इत्तर राज्यात फिरावे लागते.त्यावेळी त्यांनाअनेकदा टोल नाक्यावर टोल भरावा लागतो.सदर टोल बाबत टोलमाफी शासनाने देण्याबाबत सत्वर निर्णय घेण्याकरिता औचित्याच्या मुद्द्याद्वारे मागणी राजेश क्षीरसागर यांनी केली होती.त्या अनुषंगाने काही जाचक अटी शिथिल करून रु 20000 पर्यंत निवृत्ती वेतन लागू होणार असून त्याबाबत दोन दिवसात आदेश जारी होणार आहे.त्यामुळे वर्षानुवर्षे या क्षेत्रात काम करणारी पत्रकार बांधवांच्या साठी अतिशय आनंदाची बातमी मिळाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच पत्रकारांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन होणार आहे.त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय झाल्यास पत्रकारांना दिलासा मिळणार आहे.याबाबत शासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.