Home क्राईम जिल्ह्यात 4 ऑगस्ट पर्यंत बंदी आदेश लागू

जिल्ह्यात 4 ऑगस्ट पर्यंत बंदी आदेश लागू

3 second read
0
0
57

no images were found

जिल्ह्यात 4 ऑगस्ट पर्यंत बंदी आदेश लागू

 

कोल्हापूर : मोहरम हा सण दिनांक 20 ते 29 जुलै  2023  या कालावधीत मोठया उत्साहात साजरा होणार असल्याने व कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यात्रा, उरुस इत्यादी सण साजरे होणार असल्यामुळे या दरम्यान एखादी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होवून तसेच आक्षेपार्ह स्टेटस ठेवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) नुसार अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी 21 जुलै रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते 4 ऑगस्ट रोजी रात्री 24 वाजेपर्यंत बंदी आदेश अंमलात राहील.

 जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियाव्दारे आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यामुळे काही घटनामध्ये परिस्थिती चिघळून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून दोन गटामध्ये तेढ निर्माण झाला होता. त्यानुसार पोलीस ठाणे अंतर्गत दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर सणांच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हा बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…