
no images were found
“कौशल्ये हे आधुनिक जगाचे चलन आहे” – विजयसिंह भोसले
श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकमध्ये जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह भोसले यांचे व्याख्यान झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, “शिक्षण व रोजगार यातील दरी भरून काढण्यासाठी कौशल्ये आवश्यक आहेत. जगातील आर्थिक, सामाजिक व तंत्रज्ञानातील बदलांसोबतच आवश्यक कौशल्येही बदलत आहेत. ती युवकांनी आत्मसात करावीत. त्याने युवकांचा वैयक्तिक आणि राष्ट्राचाही उत्कर्ष होईल. इंटर्नशिप हे कौशल्य विकासाचे प्रभावी साधन आहे. कौशल्याधारित उद्योजकता विकास कार्यक्रमांमधून नोकरी शोधणाऱ्यांऐवजी रोजगार देणारे तरूण तयार होतील. न्यू पॉलिटेक्निकमधील ‘स्मार्ट स्किल सेंटर’ याबाबतीत महत्त्वाची भुमिका बजावेल.”
“न्यू पॉलिटेक्निकमधील स्मार्ट स्किल सेंटर विद्यार्थ्यांना जगाच्या बदलत्या प्रवाहाचा वेग पकडण्यास सक्षम करेल”, असे प्रतिपादन स्मार्ट स्किल सेंटरचे समन्वयक प्रा. उमेश पाटील यांनी केले.
कार्यक्रमासाठी प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रास्ताविक प्रा. प्रविण जाधव यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. कु. ऋतुजा पाटील यांनी केले. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक, विभागप्रमुख उपस्थित होते.