no images were found
ई-आर-1 विवरणपत्र 31 जुलैपर्यंत भरण्याचे आवाहन
कोल्हापूर : सर्व शासकीय, निमशासकीय, केंद्र शासन व राज्य शासन अंगीकृत व खासगी सर्व आस्थापनांनी त्यांच्या कार्यालयाचे ई-आर-1 विवरणपत्र सांख्यिकी कार्यालयाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर दि. 31 जुलै 2023 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरण्याचे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले.
जून 2023 रोजी संपणाऱ्या तिमाहीची ई-आर-1 (त्रैमासिक) सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांकडून त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मनुष्यबळाची सांख्यिकी माहिती (पुरूष/स्त्री एकूण) संकलीत करण्याचे काम चालू आहे. सांख्यिकी विभागाकडून यापूर्वीच युझरनेम व पासवर्ड देण्यात आलेले आहेत. ई-आर रिटर्नची सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाही नंतर प्रत्येक महिन्याच्या 1 ते 30 तारखेपर्यंत भरणे आवश्यक आहे, अधिक माहितीसाठी 0231-2545677 दूरध्वनी या क्रमांकावर व या कार्यालयाचे लिपीक-टंकलेखक, संभाजी पोवार, 9545228646 या भ्रमणध्वनी क्रमांक कार्यालयीन वेळेत व संपर्क साधावा. याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही श्री. माळी यांनी केले आहे.