no images were found
डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या ३ विद्यार्थ्यांची परदेशात निवड
कोल्हापूर– कसबा बावडा येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केमिकल विभागातील तृतीय वर्षांतील तीन विद्यार्थ्याची युरोपियन कमिशनच्या स्कॉलरशिप अंतर्गत विदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये निवड झाली आहे.
महाविद्यालयाच्या अथर्व माधव चाफले व शिवराज मारुती भांदिगरे यांवही हेलेनिक अमेरिकन विद्यापीठ,ग्रीस येथे तर वैभवी अजित घारे हीची थायलंड मधील नामांकित माई चौंग विद्यापीठात इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. महाविद्यालयाच्या संशोधन विभागाच्या मार्फत या निवडी करण्यात आल्या आहेत.
या इंटर्नशिप दरम्यान हे विद्यार्थी या नामांकित विद्यापीठांमध्ये सुमारे दोन महिने तेथील जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांच्या हाताखाली नाविन्यपूर्ण,अद्यावत व देश उपयोगी अशा विषयांवर संशोधन करणार आहेत. या निवडीसाठी मुंबईच्या विश्व निकेतन महाविद्यालय संस्थेचे उपाध्यक्ष व विश्वस्त डॉ. सुनील इनामदार, महाविद्यालयाचे संशोधन अधिष्ठाता डॉ अमरसिंह जाधव, विभाग प्रमुख डॉ के टी जाधव यांनी परिश्रम घेतले.
निवडीसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ अनिल कुमार गुप्ता, प्राचार्य डॉ संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.