no images were found
पर्यावरण दिनानिम्मित बालकल्याण संकुल येथील ६० विद्यार्थिनींची शिवाजी विद्यापीठास भेट
दरवर्षी ५ जुन रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. पर्यावरण बाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी या दिवसाचे महत्व आहे. १९७२ पासून जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्राने १९७२ पासून ५ जून हा जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्याचे जाहीर केले तेव्हा पासून दरवर्षी ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो व तो साजरा करण्याची थीम ठरवली जाते. ह्या वर्षी ‘Beat Plastic Pollution” हा विषय असून ह्या दिवसाचे अवचित्य साधून पर्यावरण दिना निम्मित २ जून २०२३ रोजी पर्यावरणशास्त्र आधिविभाग व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बालकल्याण संकुल येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आयुक्त श्रीमती कादंबरी बलकवडे व उपायुक्त श्रीमती शिल्पा दरेकर तसेच पर्यावरणशास्त्र आधिविभागातील शिक्षक व संशोधक विद्यार्थी यांनी उपस्थिती दर्शवली होती.
या स्पर्धेत १३९ हून जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. सदर चित्रकला स्पर्धेमध्ये विजयी झालेल्यांस ५ जून २०२३ रोजीशिवाजी विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागात पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. यासाठी मा. आधिष्टाता प्रा. (डॉ.) एस. टी. ठकार यांनी उपस्थिती दर्शवली. बालकल्याण संकुल येथील विद्यार्थ्यांप्रती आपली सामाजिक बंधीलीकी लक्षात घेता सदर विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठातील विविध विभागांची आणि पर्यावरणपूरक उपक्रमाची माहिती होण्याच्या द्रुष्टीने क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये बालकल्याण संकुल येथील ६० विद्यार्थिनींना शिवाजी विद्यापीठातील लीड बोटानिकल गर्डेन, प्राणीसंग्रहालय, रेशिमशात्र तंत्रज्ञान आणि पर्यावरणशास्त्र विभागाची भेट घडवून आणण्यात आली.
शिवाजी विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागाच्या आवारात मा. आधिष्टाता प्रा. (डॉ.) एस. टी. ठकार व माजी विभागप्रमुख प्रा. (डॉ.) पी. डी. राऊत ह्यांच्या हस्ते झाडांचे रोपण करण्यात आले. ह्या कार्यक्रमामध्ये पर्यावरण शास्त्र विभागाच्या विभागप्रमूख डॉ. आसावरी जाधव ह्यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. डॉ. रसिया पडळकर यांनी सूत्रसंचालन आणि पाहुण्यांची ओळख करून दिली. शेवटी कार्यक्रमाचे आभार डॉ. पल्लवी भोसले ह्यांनी मानले. सामाजिक प्रवाहापासून बाजूला असलेल्या विद्यार्थिनींना पर्यावरण रक्षणाचे धडे देण्यासाठी आणि शिवाजी विद्यापीठातील शिक्षणाच्या संधी माहित करून देण्यासाठी सदर कार्यक्रम महत्वाचा ठरला.