no images were found
शिवसेनेच्या वर्धापनदिनापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
या भेटीत राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असून, शिवसेनेच्या वर्धापनदिनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करायला हवा असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत मांडल्याची माहिती दिली आहे. : गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखावर तारखा समोर येत आहेत. 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मंत्रिमंडळ विस्तार आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच केला जाणार आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे वादग्रस्त आणि प्रभावहीन ठरलेल्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्यात येण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळामध्ये महिलांना देखील स्थानं दिलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.भाजपच्या मिशन 45 ला फायदेशीर असणाऱ्या नेत्यांचीच मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान मिळत असलेल्या माहितीप्रमाणे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या दोन खासदारांना मंत्रिपद देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.