Home Uncategorized ओडिसामध्ये ट्रेनच्या भयंकर अपघातानं देशाला मोठा धक्का; 288 प्रवाशांचा मृत्यू, 900 हून अधिक प्रवासी जखमी

ओडिसामध्ये ट्रेनच्या भयंकर अपघातानं देशाला मोठा धक्का; 288 प्रवाशांचा मृत्यू, 900 हून अधिक प्रवासी जखमी

1 second read
0
0
34

no images were found

ओडिसामध्ये ट्रेनच्या भयंकर अपघातानं देशाला मोठा धक्का; 288 प्रवाशांचा मृत्यू, 900 हून अधिक प्रवासी जखमी

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात कोरोमंडल एक्स्प्रेस आणि बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडी रुळावरून घसरल्याने हा अपघात झाला. गेल्या काही वर्षातला हा सर्वात मोठा अपघात असल्याचं सांगितलं जात आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. ह्या अपघाताचे फोटो अंगावर काटा आणणारे आहेत. ट्रेनचा अक्षरश: चुराडा झाला आहे. या प्रकरणी रेल्वेमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

 4000 प्रवासी यावेळी वेगवेगळ्या ट्रेनमध्ये होते. ट्रेनची भयंकर अवस्था झाली. कोचचा चुराडा झाला आणि मृतदेह अक्षरश: कोच कापून, कोचचे तुकडे बाजूला करुन बाहेर काढण्याची वेळ आली. या भयंकर अपघातात 288 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.

या भीषण रेल्वे अपघातानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आज एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. आपली व्यक्ती सुखरुप आहे की नाही हे पाहण्यासाठी फोन वाजत आहेत. मृतदेह काढत असताना ट्रेन अपघातात काही फोन देखील मिळाले. यावेळी एक फोन तर सतत काळजीपोटी वाजत आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीला काही झालं तर नाही ना या भीतीनं नातेवाईकांचा जीव कासावीस झाला आहे.

ओडिसामध्ये झालेल्या या भयंकर अपघातानं देशाला मोठा धक्का दिला. काहींची पत्नी, कुणाचा नवरा तर कुणाचा मुलगा या ट्रेननं प्रवास करत असावा, अपघाताची बातमी कळताच काळजात धस्स झालं आणि फोन वाजायला लागले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवछत्रपती पुरस्कार सोहळा ऐतिहासिक असेल- क्रीडामंत्री भरणे

शिवछत्रपती पुरस्कार सोहळा ऐतिहासिक असेल- क्रीडामंत्री भरणे   पुणे : अनेक वर्षांनंतर स…