no images were found
निसर्ग नियमाचे पालन हाच खरा निसर्गोपचार – योगाचार्य प्रवीण देशपांडे
आहार, विहार, आचार, विचार हेच खरे निसर्ग नियम असून या नियमाचे दैनंदिन पालन केल्यास माणसाला आरोग्य लाभते. त्यामुळे निसर्गोपचार ही फक्त उपचार पद्धती नसून ती जीवनपद्धती आहे असे मत नाशिकच्या योगधाम केंद्राचे संचालक योगाचार्य प्रवीण देशपांडे यांनी आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानमाली प्रसंगी व्यक्त केले. गुरूवारी विभागाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागाचे संचालक आर. जी. पवार होते.
शिवाजी विद्यापीठात निसर्गोपचार व योग अभ्यासक्रम शिकवला जातो या अंतर्गत विविध व्याख्यानांचे आयोजन केले जाते. निसर्गोपचार एक जीवनपद्धती या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्याना प्रसंगी प्रवीण देशपांडे यांनी आपली मते मांडली. व्याख्यानादरम्यान देशपांडे यांनी निसर्गोपचार म्हणजे काय,निसर्गोपचार पद्धती,आहार,विहार,आचार,विचार ,योग याबाबत शास्त्रोक्त माहिती विद्यार्थ्यांना दिली. अत्यंत विनोदी व बहारदार शैलीत झालेल्या या भाषणाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी झालेल्या अध्यक्षीय भाषणात विभाग प्रमुख डॉ. आर. जी. पवार सर यांनी विभागाच्या विविध उपक्रमाबद्दल माहिती देतानाच निसर्गोपचाराचे महत्त्व विशद केले .कार्यक्रमाचे स्वागत डॉ.सुमन बुवा यांनी केले तर प्रास्ताविक विणा मालडीकर, यांनी केले कार्यक्रमाचे आभार उदय घाटे तर सूत्रसंचालन रवींद्र खैरे यांनी केले. यावेळी अरविंद पालके,श्वेतालीना पाटील,प्रीती चव्हाण, आसावरी कागवाडे, नीलम मोरे, रंजना टिकेकर, यासह विभागातील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.