no images were found
मी भाजपची होऊ शकते. पक्ष माझा होऊ शकत नाही – पंकजा मुंडे
तुम्ही म्हणताय ताईची पार्टी ताईची पार्टी. माझी कुठली पार्टी मी भाजपची आहे. भाजप माझी थोडीच आहे. भाजप खूप मोठा पक्ष आहे. मी भाजपची होऊ शकते. पक्ष माझा होऊ शकत नाही. कारण तो मोठा पक्ष आहे, असं धक्कादायक विधान पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने दिल्लीत आज राष्ट्रीय समाज पक्षाकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या.
मला भीती वाटत नाही. कशाचीच भीती वाटत नाही. भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच आहे. कशाची चिंता नाही. काही नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईल. महादेव जानकर जातील मेंढ्या वळायला. अजून काय आहे, असं सूचक विधानही मुंडे यांनी यावेळी केलं
आम्हाला काही गमवायचंच नाही. आम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची आस्था, अपेक्षा आणि लालसा नाही असही त्यांनी यावेळी सांगितलं.