
no images were found
फडणवीसांनी केला खुलासा राज ठाकरेंच्या भेटीत कोणत्या गप्पा झाल्या
मुंबई : राज्यात सध्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचेही वारे वाहू लागले आहेत. अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल तर काहीच ठरलेले नाही, पण तरीही मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेण्यामागचे गुपित काय, याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. रात्री अचानक उशीरा ही भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. गेल्या काही दिवसांत राज ठाकरे यांनी भाजपनं घेतलेल्या काही भूमिकांवर टीका केली होती. त्यामुळं या दोघांमध्ये नेमकी कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होते याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. या रात्रीच्या भेटीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही भेट अराजकीय गप्पा मारण्यासाठी मी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेलो होतो अशी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की,’बऱ्याच दिवसांपासून आमचं ठरलं होतं, एक दिवस गप्पा मारायला बसु आणि त्याचा मुहूर्त काल लागला. आम्ही गप्पा मारल्या. या भेटीत राजकीय गोष्टी सोडुन गप्पा मारायच्या असंही फडणवीस यांनी यावेळी बोलताना म्हंटलं आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे सेना स्वतंत्र लढते की महाविकास आघाडीसोबत लढते, हे अद्याप निश्चित झालेले नाही. तसे झाल्यास एकाच विचारांचे ठाकरे सेना, शिंदे सेना, मनसे असे तीन पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतील. आणि त्याचा फायदा निश्चितच भाजपला होईल. त्यादृष्टीने आत्तापासून तयारी सुरू झाली आहे. सर्वच पक्षांमधील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट पूर्णपणे राजकीय उद्देशानेच होती, असा दावा राजकीय वर्तुळात केला जात आहे.