Home शैक्षणिक शालेय साहित्याची नियमाने विक्री करावी -वैधमापन शास्त्र उपनियंत्रक रा.ना.गायकवाड

शालेय साहित्याची नियमाने विक्री करावी -वैधमापन शास्त्र उपनियंत्रक रा.ना.गायकवाड

9 second read
0
0
121

no images were found

शालेय साहित्याची नियमाने विक्री करावी -वैधमापन शास्त्र उपनियंत्रक रा.ना.गायकवाड

 

        कोल्हापूर:  जिल्ह्यात शालेय साहित्य उत्पादक, विक्रेते व दुकानदार यांनी आवेष्टनावर उत्पादकाचे अथवा आवेष्टकाचे नाव व पूर्ण पत्ता (पिनकोड सह), वस्तूंचे सर्व सामान्य नाव, उत्पादनाची तारीख व वर्ष, आवेष्टीत वस्तूंची अधिकतम किरकोळ विक्रीची सर्व करांसहित किंमत, आवेष्टीत नगांची संख्या, ग्राहक तक्रारीबाबतचा क्रमांक, कार्यालयीन पत्ता, ई-मेल अॅड्रेस आदी आवश्यक मजकूर उत्पादकाकडून आपल्या उत्पादित आवेष्टनावर नमूद करणे अनिवार्य आहे. सर्व पॅकबंद वस्तूंच्या उत्पादित आवेष्टनावर ही माहिती नमूद करुनच विक्री करणे अनिवार्य असल्याची माहिती कोल्हापूर वैधमापन शास्त्र उपनियंत्रक रा.ना.गायकवाड यांनी दिली आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर दरवर्षीप्रमाणे स्थानिक पातळीवरील शाळा,विद्यालये, महाविद्यालये सुरु होत आहेत. या सर्व घटकांना शालेय साहित्य वह्या, पुस्तके, नोट्स, पॅड्स, पेन, पेन्सिल, शार्पनर, खोडरबर, व इतर शालोपयोगी साहित्य यांचा पुरवठा स्टेशनरी उत्पादकांकडून होतो. याची किरकोळ विक्री किराणा दुकानदार तसेच होलसेल विक्रेते, डिस्ट्रिब्यूटर यांच्या मार्फत होत असतो. या सर्व पॅकबंद वस्तू या वैधमापन शास्त्र अधिनियम 2009 व वैधमापन शास्त्र आवेष्टीत नियम 2011 या नियमाअंतर्गत येतात.वैध आवेष्टीत वस्तू किरकोळ विक्रेत्यांनी तसेच डिस्ट्रिब्यूटर यांनी विक्री करणे नियमास धरुन आहे. याची खबरदारी उत्पादक,पॅकर,आयातदार,किरकोळ विक्रेते, डिस्ट्रिब्यूटर यांनी घेणे कायदा व नियमांतील तरतुदीनुसार आवश्यक आहे.

कायदा व नियमांचे उल्लंघन झाल्यास या कार्यालयाकडून ग्राहकांच्या फसवणूकीच्या अनुषंगाने विशेष मोहीम राबवून तपासणी करण्यात येणार असून उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती वैधमापन शास्त्र उपनियंत्रक श्री.गायकवाड यांनी दिली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …