इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ. उंचगाव- (प्रतिनिधी ) न्यू पॉलिटेक्निक मधील अंतिम वर्ष इलेक्ट्रिकल विभागातील विद्यार्थ्यांचा आज निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री रत्नाकर मोहिते (उपकार्यकारी अभियंता, महावितरण ,एस टी सी, ताराबाई पार्क, कोल्हापूर) उपस्थित होते.यावेळी बोलताना त्यांनी महावितरण मधील इलेक्ट्रिकल विभागामध्ये पदविका व पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर विविध पदाबद्दलची शैक्षणिक अहर्ता व परीक्षेबद्दलचे मार्गदर्शन केले. महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच माननीय प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की न्यू पॉलिटेक्निक हे विद्यार्थ्यांचं माहेर घर आहे . तसेच विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. विभाग प्रमुख श्री बी बी राजगिरे यांनी महावितरण आणि न्यू पॉलिटेक्निक यांच्यातील सामंजस करारा अंतर्गत अशा प्रकारे वेगवेगळे उपक्रम राबवीत असल्याची माहिती दिली.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बेस्ट आउटगोइंग स्टुडन्ट- ऋतुराज कुंभार या विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. प्राध्यापक नितीन सावंत यांनी कार्यक्रमाचे नियोजन द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या सहभागाने कले.