
no images were found
‘लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजस्मृती सांगता’
‘लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजस्मृती सांगता व कृतज्ञता पर्व 2023 निमित्त शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाटयशास्त्र विभागाच्या वतीने ‘रंग कला – संस्कृतीचे’ या कार्यक्रमाचे अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी बहारदार सादरीकरण केले. संगीत व नाटयशास्त्र विभागप्रमुख डॉ. अंजली निगवेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या सुरवातीला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळयाला हार व पुष्पांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात भरतनाटयम विभागाच्या विद्यार्थीनींच्या गणेशवंदनेने झाली. त्यानंतर अधिविभागाचे विद्यार्थी रूद्र कुलकर्णी यांनी राग गुर्जरी तोडी, धनाजी पाटील यांनी एकल तबला वादन सादर केले. प्रितीसुरी दुधारी, निर्गुणाचा संग, हे श्याम सुंदरा, बोलावा विठ्ठल, अंदाज आरशाचा, मधुकर वनवन फिरत करी
इत्याद गाण्यांचे कु. धनश्री गाडगीळ, प्रियांका मिरजकर व प्रतिक्षा पवार या विद्यार्थीनींनी अतीशय रंजक व ढंगदार सादरीकरण केले. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक व आभार डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी मानले. तर सुत्र संचलन श्री. अतुल परिट यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमात हार्मोनियमची साथ सौ. गौरी कुलकर्णी, डॉ. सचिन कचोटे, तबल्याची साथ सौरभ सनदी यांनी केली. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात रंगलेल्या या कार्यक्रमासाठी मराठी अधिविभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. नंदकुमार मोरे, प्रा. डॉ रणधीर शिंदे व इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ. प्रभंजन माने त्याबरोबर संगीत व नाटयशास्त्र विभागाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठया संख्येने उपस्थित होते.