Home शैक्षणिक शिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र दिन उत्साहात

शिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र दिन उत्साहात

2 second read
0
0
137

no images were found

शिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र दिन उत्साहात

 कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

सकाळी ठीक ८ वाजता कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्र संचालक डॉ. रामचंद्र पवार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थिनींसह सामूहिक राष्ट्रगीत, राज्यगीत तसेच विद्यापीठ गीत गायन करण्यात आले. कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले. सर्व उपस्थितांना कुलगुरूंनी महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थी विकास विभागातर्फे विद्यापीठातील प्रशासकीय कर्मचारी महिलांच्या लेझीमपथकाचा कार्यक्रम मुख्य प्रशासकीय भवन इमारतीसमोर सादर करण्यात आला. यामध्ये सहभागी महिला कर्मचाऱ्यांचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी अभिनंदन केले. चहापानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …