no images were found
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी मध्ये ‘टेक्नो केम 2K23’ संपन्न
कसबा बावडा-( प्रतिनिधी )
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील केमिकल इंजिनिअरिंग विभागाने आयोजित केलेल्या ‘टेक्नोकेम 2K23’ या राष्ट्रीय स्तरावरील टेक्निकल इव्हेंटला प्रचंड प्रतिसाद मिळाला. काळाची पावले ओळखून भविष्यातील येणाऱ्या तंत्रज्ञानाला मुलांनी समरस व्हावे, त्यांच्यातील सृजनशीलता, नवनिर्मिती वृध्दींगत व्हावी तसेच समाज उपयोगी संशोधनाला चालना मिळावी या उद्देशाने ही दोन दिवसीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती
पहिल्या दिवशी प्रोजेक्ट कॉम्पीटीशन, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि पोस्टर कॉम्पीटीशन या स्पर्धां सपन्न झाल्या. त्यासाठी 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. दुसऱ्या दिवशी मॉक प्लेसमेंट आणि क्विझ या स्पर्धेत 200 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून मिस्टेअर हेल्थ अँड हायजीन प्रा ली. चे मुख्य कार्यकारी अधिकारी तेजस ठाकूर, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे टेक्निकल सर्व्हिसेस डेप्युटी मॅनेजर रमेश डोईफोडे, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, अधिष्ठाता प्रा. एम.जे.पाटील, विभाग प्रमुख डॉ. के टी जाधव, अधिष्ठाता संशोधन डॉ अमरसिंह जाधव, डॉ राहुल पाटील, डॉ राहुल महाजन, समन्वयक प्रा.किरण पाटील व विभागाचे सर्व प्राध्यापक वर्ग, सहभागी स्पर्धक आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रोडक्ट कॉम्पीटीशनद्वारे विद्यार्थ्यांनी नवनवीन कल्पना राबवून केलेल्या प्रॉडक्ट, प्रोजेक्ट आणि पोस्टरचे समीक्षक तेजस ठाकूर, रमेश डोईफोडे आणि प्रा. एन. एच.शिंदे यांनी कौतुक केले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी.पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन तर कार्यक्रमास कार्यकारी संचालक डॉ ए.के.गुप्ता व प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे यांचे प्रोत्साहन लाभले.