no images were found
‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज माहितीपट महोत्सव २०२३’
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज माहितीपट महोत्सव २०२३’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवानिमित्त शाहू महाराजांच्या योगदानावर माहितीपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन केले आहे. यासाठी १७ एप्रिल ही नोंदणीसाठी अंतिम तारीख देण्यात आली होती. यामध्ये मुदतवाढ दिली असून इच्छुक सहभागींना दिनांक ४ मे, सायं. ५ वाजेपर्यंत नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. महोत्सवात प्रवेशासाठी नोंदणी करणे आवश्यक असून प्रवेश नि:शुल्क आहे. महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना, सुचविलेले विषय, नियम, अटी तसेच नोंदणी अर्ज नमुना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर http://www.unishivaji.ac.in उपलब्ध आहे. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय तसेच स्पेशल ज्युरी, बेस्ट सिनेमेटोग्राफी, बेस्ट एडिटिंग , बेस्ट साउंड अशा स्वरुपाची पारितोषिके तसेच शिवाजी विद्यापीठाचे सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. महोत्सवासाठी सहभाग घेणाऱ्या
र्विद्यार्थ्यांनी त्यांचा प्रवास आणि इतर खर्च स्वतः करावयाचा आहे. हा महोत्सव तांत्रिक कारणांमुळे दिनांक २७ व २८ एप्रिल ऐवजी दिनांक ११ व १२ मे २०२३ रोजी शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात संपन्न होणार आहे. स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला नोंदणी अर्ज, महाविद्यालयाचे ना-हरकत प्रमाणपत्र तसेच मेल ड्राईव्हच्या माध्यमातून माहितीपटाची क्लिप journalism@unishivaji.ac.in या मेल आय डी वर ४ मे, सायं. ५ वाजेपर्यंत पाठवावेत. असे आवाहन विभागप्रमुख प्रा.डॉ. निशा पवार यांनी केले आहे.