
no images were found
सना सय्यदशी असलेल्या नात्याबद्दल पारस कलनावत म्हणतो, “तिच्यापेक्षा दुसरी चांगली सहकलाकार असू शकत नाही!”
‘झी टीव्ही’वरील सर्वात लोकप्रिय मालिका असलेल्या ‘कुंडली भाग्य’ मालिकेने आपल्या कथानकातील रंजकतेमुळे प्रेक्षकांमधील उत्कंठा गेल्या पाच वर्षांमध्ये सतत वाढती ठेवली आहे. मालिकेतील अर्जुन सूर्यवंशीची भूमिका शक्ती अरोराने साकारली असून अर्जुन हाच करण लुथ्रा असतो, हे प्रेक्षकांनी पाहिले आहे. मालिकेच्या कथानकाचा काळ अलीकडेच 20 वर्षांनी पुढे नेण्यात आल्यानंतर मालिकेत पारस कलनावत, बसीर अली आणि सना सय्यद हे कलाकार अनुक्रमे राजवीर लुथ्रा, शौर्य लुथ्रा आणि पालकी खुराणा यांच्या भूमिका साकारताना दिसत आहेत. कथानकाला मिळालेल्या नाट्यपूर्ण कलाटणीनंतर राजवीरला आपले आई-वडील- प्रीता आणि करण लुथ्रा (श्रध्दा आर्य आणि शक्ती आनंद) यांच्याबद्दलचे सत्य समजते.
मालिकेत प्रवेश केलेले हे कलाकार रात्रंदिन चित्रीकरणात व्यग्र असून त्यांच्यात आता घनिष्ठ नाती निर्माण झाली आहेत.
असेच एक नाते आहे पारस आणि सना या लोकप्रिय कलाकारांमध्ये. या दोघांनी एकत्र चित्रीकरणाला प्रारंभ करून केवळ एक महिनाच झालेला असला, तरी त्यांच्यात एक मैत्रीचे छान नाते निर्माण झाले आहे. किंबहुना या दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांना या दोघांमधील नाते आवडत असून त्यांनी या दोघांसाठी #PalVeer हा हॅशटॅगही तयार केला आहे. या दोघांमधील मैत्री इतकी घनिष्ठ आहे की पारसने अलीकडेच सना सय्यदबरोबर एक छायाचित्र सोशल मीडियावर प्रसृत केले होते. त्याखाली त्याने आपली टिप्पणी दिली होती, ती अशी, “तिच्यापेक्षा दुसरी चांगली सहकलाकार मला मिळालीच नसती!”