no images were found
भगवान महावीर अध्यासनास श्रीमती मंगला लिंबेकर यांची महत्वपूर्ण देणगी
कोल्महापूर : श्रीमती मंगला लिंबेकर या भगवान महावीर अध्यासनाच्या विद्यार्थीनी असून आपल्या चरीतार्थासाठी त्या पापड विकून उत्पन्न मिळवतात, परिस्थिती गरीबीची असली तरी त्यांनी कष्टातून मिळालेल्या पैशाचे दान देण्याचा महत्वाचा दानशूरपणा रू. १,१००/- ची देणगी देवून व्यक्त केला. देणगीसाठी कुवतीपेक्षा दातृत्वाची भावना महत्वाची असते हे या निमित्ताने आधोरेखित झाले आहे. या बृहत देणगी बद्दल शिवाजी विध्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. डी. टी. शिर्के, प्र. कुलगुरू मा. डॉ. पी एस पाटील, कुलसचिव मा. डॉ. व्ही एन शिंदे यांनी श्रीमती मंगला लिंबेकर यांचे आभार मानले आहेत. भगवान महावीर अध्यासनाच्या भव्य इमारत बांधकामास सर्व दानशूर, अहिंसा प्रेमी व्यक्ति व संस्थांनी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन डॉ. विजय ककडे, प्राध्यापक भगवान महावीर अध्यासन, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. यांनी केले आहे. सदर देणगी आयकर सवलतीस(१०० %) पात्र आहे.