Home शैक्षणिक कोल्हापूर शहरात एक तास वीज बचत : डी. वाय. पाटील अभियांत्रिकीतर्फे बिंदू चौकात उपक्रम

कोल्हापूर शहरात एक तास वीज बचत : डी. वाय. पाटील अभियांत्रिकीतर्फे बिंदू चौकात उपक्रम

0 second read
0
0
34

no images were found

कोल्हापूर शहरात एक तास वीज बचत : डी. वाय. पाटील अभियांत्रिकीतर्फे बिंदू चौकात उपक्रम

कोल्हापूर/:(प्रतिनिधी)
वीज बचतीचे महत्त्व नागरिकांना समजावे, कार्बनच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उत्सर्जनास प्रतिबंध व्हावा, यासाठी ‘अर्थ अवर’ अंतर्गत कोल्हापूर शहरातील २२ हजार पथदिवे बंद करून विजेची बचत करण्यात आली.
यावेळेमध्ये नागरिकांनी अनावश्यक उर्जेची उपकरणे बंद ठेवून आपला सहभाग नोंदवला. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी, कोल्हापूर महानगरपालिका व महावितरणने हा उपक्रम आयोजित केला होता.
बिंदू चौकात मान्यवरांच्या उपस्थितीत हा उपक्रम झाला. यावेळी इंजिनिअरिंगच्या ३०० विद्यार्थ्यांनी 2 हजार पणत्या प्रज्वलित केल्या.
साडेसात ते साठेआठ वेळेत महापालिकेच्या विद्युत विभागाने २२ हजार पथदिवे बंद केल्याने महापालिकेची दीड लाख रुपयांची वीज बचत झाली. याबरोबर एका तासात १३२० किलो कार्बन तयार होण्यास प्रतिबंध झाला.
जगभरात २००७ पासून हा उपक्रम सुरू झाला. १९० देशांत हा उपक्रम राबविला जातो. हा उपक्रम राबविणारे कोल्हापूर हे देशातील एकमेव शहर ठरले आहे. डी. वाय. इंजिनिअरिंगतर्फे गेल्या १३ वर्षापासून ‘अर्थ अवर’चे आयोजन केले जाते. दोन हजार पणत्या प्रज्वलित करून 60+ हा लोगो केल्यामुळे बिंदू चौक उजळून निघाला. विद्यार्थ्यांनी नागरिकांना अर्थ अवरचे महत्त्व सांगितले.
डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ.लितेश मालदे,अधिष्ठाता डॉ. राजेंद्र रायकर, एनएसएस समन्वयक प्रा. योगेश चौगुले, डॉ.राहुल पाटील,तुषार आळवेकर, डॉ.प्रतीक गायकवाड,विशाल शिंदे तसेच एनएसएसचे विध्यार्थी अमृत नरके,प्रथमेश आरगे,सौरभ केसरकर,ओंकार कोतमीरे,रत्नदीप कांबळे,सुमित कांबळे,संकेत चौगुले,वैष्णवी पानवळ, प्रज्ञा महाडिक,मृदुला साळोखे,पूनम पाटील,दिव्या फगारे,स्वप्नील माने,वैभव पाटील,नचिकेत बेजगमवार,संकेत घाटगे आदी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कोल्हापूर महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांचे या उपक्रमाला सहकार्य लाभले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…