no images were found
भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महिलांनी उद्योग व्यवसाय उभारुन सक्षम व्हावे – जिल्हाधिकारी
कोल्हापूर : भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महिलांनी आपल्यातील कलागुण ओळखून त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेवून उद्योग व्यवसायातून आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ व राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक यांच्या संयुक्त विद्यमाने नव तेजस्विनी -महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचत गटाच्या उत्पाादनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी बचत गटातील ज्येष्ठ महिला नवसाताई पाटील यांच्या हस्ते फीत कापून स्टॉल चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे, नाबार्डचे सहायक महाव्यवस्थापक आशुतोष जाधव, उमेद अभियानाच्या जिल्हा अभियान व्यवस्थापक वनिता डोंगरे, कोल्हापूर महानगरपालिकेचे डेएलएलएमचे कार्यक्रम अधिकारी रोहित सोनुले आदि उपस्थित होते.