no images were found
सर्व महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सुट
मुंबई : नुकताच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जाहीर झाला. यामध्ये एसटी बसमध्ये महिलांना तिकिटात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागाची लाईफ लाईन म्हणून ‘लाल परी’ची ओळख आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब प्रवाशांना या बसचा मोठा आधार आहे.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प सादर झाला आहे. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. यात महिलांसाठीही विविध घोषणा करण्यात आल्या. त्यात महत्त्वाची म्हणजे सर्व महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सुट मिळणार आहे.
एसटी महामंडळाची लालपरी ही ग्रामीण भागाची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाते. शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठापर्यंत लालपरी सर्वांना आपल्या ठिकाणापर्यंत पोहचवते. एसटी प्रवास सुरक्षित असतो यामुळेच अनेक महिला देखील एसटीतून प्रवासाला प्राधान्य देतात. एसटीतर्फे 65 वर्ष पूर्ण झालेल्यांना अर्धा तिकिटाच्या रकमेत प्रवास होता. त्यानंतर अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत 75 वर्षीय ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमध्ये मोफत प्रवास सवलत देण्यात आली आहे व त्यानंतर आता महिलांना देखील 50% तिकीटात सूट देण्याच निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.