Home क्राईम गणेश बिडकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल

गणेश बिडकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल

3 second read
0
0
29

no images were found

गणेश बिडकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल

ठाणे : माजी नगरसेवक गणेश बिडकर यांच्यासह कार्यकर्त्यांच्या विरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात कसबा पेठ पोटनिवडणुकीत पैसे वाटप केल्याच्या आरोपावरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.या प्रकरणी गणेश बिडकर यांच्यासह मयूर चव्हाण, नईम शेख, बाला शेख यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत युवक काँग्रेस कॅन्टोन्मेंट विभागाचे माजी अध्यक्ष फैयाज कासम शेख यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

     गणेश बिडकर आणि त्यांचे कार्यकर्ते रविवारी दुपारी दोनच्या सुमारास मंगळवार पेठेतील आएशा कॉम्प्लेक्समध्ये कार्यकर्त्यांसह आले होते. फैयाज शेख आणि त्यांचे मित्र याकूब बशीर शेख या भागात फिरत होते. त्या वेळी भाजपाचे कार्यकर्ते आएशा कॉम्प्लेक्समध्ये पैसे वाटप करत असल्याची माहिती शेख यांना मिळाली.त्यानंतर शेख तेथे गेले. तेव्हा भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या हातात केशरी रंगाची पिशवी दिसून आली. पिशवीत मतदार स्लिप ठेवण्यात आल्या होत्या. पिशवीत पैसे असल्याचे शेख यांना समजले. त्यांनी बिडकर आणि कार्यकर्त्यांकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनी फैयाज आणि याकूब शेख यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली, असे फैयाज शेख यांनी पोलिसांकडे दिलेल्या अदखलपात्र तक्रारीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक माळी तपास करत आहेत.दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीत रविवारी पैसे वाटप करण्यात आल्याचे आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…