
no images were found
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन पोलिस शहीद
छत्तीसगड : महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेवर नाकाबंदी सुरु असताना नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलिस शहीद झाले आहेत. तर एकजण जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील बोरतलाव पोलीस चौकीतील राजेश प्रतापसिंह व ललीत यादव हे आपल्या एका सहकारी मित्रासह मोटारसायकलने आज (दि.२०)सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास चहा पिण्याकरीता पोलीस चौकीपासून मुख्य राज्यमार्गावर गेले होते. 10-12 जणांच्या महिला, पुरुष नक्षल्यांच्या टोळीने विनाशस्त्र चहा पिण्याकरीता गेलेल्या तीन पोलिसांवर हल्ला केला. अचानक नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर तिसरा जखमी झाला. या जखमी शिपायामुळेच सदर घटना पोलिसांना कळाली. दरम्यान नक्षल्यांनी मोटारसायकलला आग लावून घटनास्थळावरुन पोबारा केला
या घटनेनंतर महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवर पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असून जंगलात शोधमोहिम सुरु आहे.