
no images were found
न्यू पॉलिटेक्निक व अर्थमुव्हर्स असोसिएशन यांच्यात सामंजस्य करार
कोल्हापूर -बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेवून कार्यरत असलेल्या व ‘बेस्ट पॉलिटेक्निक’ म्हणून गौरविलेल्या उचगांव येथील ‘न्यू पॉलिटेक्निक’ आणि ‘वनश्री पुरस्कार’ सन्मानित ‘अर्थमुव्हर्स मशिनरी ओनर्स असोसिएशन, कोल्हापूर’ यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. न्यू पॉलिटेक्निकचे प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे आणि अर्थमुव्हर्सचे अध्यक्ष रविंद्र पाटील यांनी या करारावर सह्या केल्या.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी स्थापन केलेल्या आणि महाराष्ट्र शासनाचा ‘आदर्श शिक्षणसंस्था’ पुरस्कार प्राप्त श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर या शतकमहोत्सवी संस्थेची न्यू पॉलिटेक्निक उचगांव ही एक नामांकित शाखा. तंत्रशिक्षणामध्ये दीपस्तंभ ठरलेल्या न्यू पॉलिटेक्निकचा उद्योग-व्यवसाय जगताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अद्ययावत व उपयुक्त असे तंत्रशिक्षण देण्यावर नेहमीच भर राहीला आहे. याच
जोरावर न्यू पॉलिटेक्निकचे माजी विद्यार्थी शासकीय, निमशासकीय, बहुराष्ट्रीय कंपनीतील क्षेत्रात उच्चपदस्थ आहेत. शिवाय, हजारो विद्यार्थी आज यशस्वी उद्योजक व व्यावसायिक म्हणून घडले आहेत.
या कराराद्वारे विद्यार्थ्यांना अर्थमुव्हींग मशिनरीचे ऑपरेशनल ट्रेनिंग व रिपेअर्स, टेक्निकल प्रोजेक्ट्स, विविध उपक्रम यासाठी संधी उपलब्ध होण्यासोबतच या क्षेत्रातील नोकरी-व्यवसाय सुरू करण्यासाठी
असोसिएशनकडून पाठबळ मिळणार आहे. मुख्यत्वेकरून ऑटोमोबाईल, मेकॅनिकल व सिव्हिल इंजिनिअरींग विभागांतील विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल.
अर्थमुव्हर्सच्या स्टाफ व ऑपरेटर्सना त्या क्षेत्रास पोषक असलेले मुलभूत टेक्निकल नाॅलेज, लॅब व एमसीईडी ट्रेनिंग न्यू पॉलिटेक्निकमध्ये दिले जाईल. त्याचबरोबर संयुक्तरित्या अर्थमुव्हींग मशिनरीचे प्रदर्शन भरवले जाईल.