
no images were found
सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या नूतन इमारतीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार : चिकोडे
कोल्हापूर :कोल्हापूर येथे सावित्रीबाई फुले रुग्णालय ग्रामीण भागातील गोरगरीब लोकांसाठी आधारवड रुग्णालय आहे. शासकीय दरामध्ये याठिकाणी रुग्णांना सेवा पुरवली जाते. त्यामुळे हे रुग्णालय सर्वसामान्य लोकांच्या गरजेचे असून हे रुग्णालय टिकले पाहिजे. सर्वसामान्यांना खाजगी रुग्णालयात या ठिकाणी उपचार घेणे दुरापास्त झाले आहे.
सध्या या रुग्णालयाची दुरावस्था झाली असून मूळच्या जुन्या इमारतीची पडझड झाली आहे. सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या विविध प्रश्नांबाबत भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी नाशिक येथे केंद्रीय कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांची भेट घेतली. सावित्रीबाई फुले रुग्णालयासाठी नूतन इमारत उभारण्याच्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत शासन स्तरावर याविषयात पाठपुरावा करून सर्वसामान्य रुग्णांसाठी आधारवड असणाऱ्या या रुग्णालयाच्या नूतन इमारत उभारणीसाठी सर्वते सहकार्य करणार असल्याचे आश्वासन डॉ भारती पवार यांनी केले आ