no images were found
‘वागले की दुनिया’मधील कलाकाराने सांगितला अनुभव
सोनी सबने प्रेक्षकांचे उत्तम कन्टेन्ट व प्रेमळ पात्रांसह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याच्या मनसुब्यासह दोन वर्षांपूर्वी मालिका ‘वागले की दुनिया – नयी पीढी नये किस्से’सुरू केली. मालिकेने पात्रांच्या दैनंदिन जीवनाच्या माध्यमातून विविध सामाजिक समस्यांना अद्वितीयरित्या दाखवण्यासोबत त्यावरील उपायांना सादर करत देशभरातील प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. मालिकेला टेलिव्हिजनवर यशस्वीरित्या दोन अद्भुत वर्षे पूर्ण होत असताना या मोठ्या यशाला साजरे करण्याची वेळ आली आहे. राजेश वागलेची प्रमुख भूमिका साकारणारे सुमीत राघवन म्हणाले,‘‘या मालिकेचा भाग असणे अविश्वसनीय अनुभव राहिला आहे. टीम व कलाकार माझ्यासाठी कुटुंब बनले आहे आणि आमच्यामध्ये निर्माण झालेल्या नात्याप्रती मी बांधील आहे. या मालिकेचे माझ्या मनात खास स्थान आहे आणि मला या मालिकेचा भाग असल्याचा अभिमान वाटतो. राजेश वागले हा मध्यमवर्गीय माणूस आहे आणि त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मला मालिकेने मागील दोन वर्षांमध्ये केलेल्या प्रवासाचा आणि मालिकेमधील पात्रांच्या परिवर्तनाचा खूप अभिमान आहे. आमच्यावर प्रेमाचा वर्षाव केलेल्या प्रेक्षकांचे मन:पूर्वक आभार.
वंदना वागलेची भूमिका साकाणाऱ्या परिवा प्रणती म्हणाल्या, ‘‘माझे वंदनाच्या भूमिकेशी सखोल कनेक्शन आहे. तिच्या भावना व स्वभाव वास्तविक जीवनात माझ्यासारखाच आहे, ज्यामुळे तिच्या वास्तविक पैलूंना सादर करणे अगदी सहजपणे साकारता येते, मग ते कपभर कॉफी न मिळाल्याने नाराज होणे असो किंवा आपल्या पतीसोबत लहान क्षणांचा आनंद घ्यायचा असो. प्रेक्षकांसमोर वंदनाच्या विविध पैलूंना सादर करणे अत्यंत आनंददायी राहिले आहे आणि गेल्या दोन वर्षांमधील हा प्रवास अद्भुत राहिला आहे.’’रील लाइफमध्ये कुटुंब म्हणून एकत्र आलो आहोत आणि मी राधिका तिला जसे पाहिजे त्याप्रमाणे घडवण्यास संधी दिल्याबद्दल कलाकार व टीमचे आभार मानते. मागील दोन वर्षांपासून आमची मालिका पाहण्यासोबत खुल्या मनाने आमचा स्वीकार केलेल्या चाहत्यांचे मनःपूर्वक आभार. कृपया आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करत राहा आणि पाहत राहा मालिका ‘वागले की दुनिया – नयी पीढी नये किस्से’.’’मालिका ‘वागले की दुनिया – नयी पीढी नये किस्से’वागले कुटुंबाच्या तीन पिढ्यांना दाखवते, जेथे ते मध्यमवर्गीय कुटुंबाच्या संघर्षांना सादर करतात. मालिकेने प्रेक्षकांमध्येकौटुंबिक मूल्ये, नाती आणि वैयक्तिक विकासाचा सकारात्मक संदेश यशस्वीरित्या पसरवलेला आहे. तसेच मालिकेने विचारशील व हृदयस्पर्शी असण्याच्या आपल्या क्षमतेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.