Home क्राईम महिला सहप्रवासाच्या अंगावर लघुशंकाप्रकरणी एअर इंडियावर डीजीसीएची कडक कारवाई

महिला सहप्रवासाच्या अंगावर लघुशंकाप्रकरणी एअर इंडियावर डीजीसीएची कडक कारवाई

4 second read
0
0
161

no images were found

महिला सहप्रवासाच्या अंगावर लघुशंकाप्रकरणी एअर इंडियावर डीजीसीएची कडक कारवाई

मुंबई : विमान प्रवासादरम्यान महिला सहप्रवासाच्या अंगावर लघुशंका केल्याप्रकरणी डीजीसीएने मोठी कारवाई केली आहे. नियमांचे उल्लघन केल्याप्रकरणी डीजीसीएने एअर इंडियाला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय कर्तव्य बजावण्यात कसूर केल्याबद्दल फ्लाइटच्या पायलट-इन-कमांडचा परवाना ३ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे. तसेच एआयच्या डायरेक्टर-इन-फ्लाइट सर्व्हिसेसवर ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

२६ नोव्हेंबर २०२२ रोजी न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये शंकर मिश्रा या प्रवाशाने वृद्ध महिलेवर लघवी केली होती. घटनेवेळी मिश्रा दारूच्या नशेत होता. या घटनेनंतर पीडित महिलेने दुसऱ्याच दिवशी विमान कंपनीकडे लेखी तक्रार केली होती.  आरोपीवर कोणतीही कारवाई न झाल्याने महिलेने ४ जानेवारी रोजी दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. यानंतर दिल्ली पोलिसांनी आरोपी शंकर मिश्राविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला ६  जानेवारी रोजी बेंगळुरू येथून अटक केली होती.

 त्यानंतर मिश्राला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तर, एअर इंडियाकडून मिश्रावर ३० दिवसांसाठी उड्डाण बंदी घातली होती. या प्रकरणातील आरोपी शंकर मिश्राने आपण असं काहीही केलं नसल्याचं म्हटले होते. तक्रारदार महिलेनेच स्वतःच्या अंगावर लघवी केली होती अशी माहिती मिश्राने त्याला दिल्ली न्यायालयात हजर केल्यानंतर दिली होती. त्याच्या या जबाबाने अनेक स्तरातून आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…