Home क्राईम अल्पवयीन प्रेयसीची मस्करी ठरली जीवघेणी; गळफास घेतल्याने मृत्यू

अल्पवयीन प्रेयसीची मस्करी ठरली जीवघेणी; गळफास घेतल्याने मृत्यू

0 second read
0
0
61

no images were found

अल्पवयीन प्रेयसीची मस्करी ठरली जीवघेणी; गळफास घेतल्याने मृत्यू

अमरावती : उत्तर प्रदेशातील वीस वर्षीय तरुण आणि अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील सोळा वर्षीय मुलीची सोशल मीडियावर ओळख झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. प्रेमात एकमेकांची मस्करी एक दिवस अल्पवयीन मुलीच्या अंगलट आली. यातूनच सव्वा वर्षांपूर्वी तिचा जीव गेल्याची घटना उघडकीस आली आहे.
देहाद भागातील रहिवासी बेभापती लालाराम असे या तरुणाचे नाव आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील एका १६ वर्षीय मुलीची बेभापती याच्यासोबत सोशल मीडियावर ओळख झाली. दोघांचीही एकमेकांसोबत प्रत्यक्षात भेट झाली नव्हती. मात्र दोघेही इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून एकमेकांसोबत संपर्कात होते. दोघांचेही वय लक्षात घेता त्यांच्यात परिपक्वता नसल्याचे समोर आले आहे. ‘तू मला मिळाली नाहीस, तर मी स्वतःचा जीव देऊ शकतो’ असे म्हणून सोशल मीडियावरील या प्रियकराने आत्महत्या करत असल्याची गंमत करणारा प्रँक व्हिडिओ काढून मुलीला पाठवला.
‘मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करते, मी कुठेही कमी नाही’ हे दाखवण्याच्या नादात १६ वर्षीय मुलीनेही चक्क गळफास घेत असल्याचा व्हिडिओ प्रियकराला पाठवण्याचे ठरवले. मात्र, या प्रयत्नात मुलीला खरोखरच गळफास लागला आणि तिचा जीव गेला. ही घटना २५ नोव्हेंबर २०२१ रोजी घडली होती. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी त्या तरुणाला अटक करणे आवश्यक आहे. परतवाडा पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस पथक त्या तरुणाच्या शोधात उत्तर प्रदेशसाठी रवाना केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मदर्स डे निमित्त आयोजित स्पर्धेत अजिंक्य विजयकुमार खराडे विजेता

मदर्स डे निमित्त आयोजित स्पर्धेत अजिंक्य विजयकुमार खराडे विजेता   कोल्हापूर, – …