
no images were found
तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग महाविद्यालयात रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन
कोल्हापूर : राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचे दि. 11 ते 17 जानेवारी 2023 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाअंतर्गत तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग महाविद्यालय, वारणा येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत मोटार वाहन निरीक्षक इंद्रजीत आमते व सागर भोसले यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षिततेचे महत्त्व समजावून सांगितले.
रस्त्यावर सुरक्षित वाहन चालवण्या या विषयी मार्गदर्शन केले. रस्त्यावर वाहने चालवताना हेल्मेटचा वापर, सीट बेल्टचा वापर, वाहन चालवताना मोबाईलचा वापर न करणे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
सर्व विद्यार्थ्यांनी, उपस्थित लोकांनी वाहन चालवताना वाहतूक चिन्हांचे आणि नियमांचे पालन करण्याविषयी शपथ घेतली.