Home क्राईम इचलकरंजीमधील मुलींच्या सहलीच्या बसला बारामतीत अपघात; 27 जखमी

इचलकरंजीमधील मुलींच्या सहलीच्या बसला बारामतीत अपघात; 27 जखमी

0 second read
0
0
164

no images were found

इचलकरंजीमधील मुलींच्या सहलीच्या बसला बारामतीत अपघात; 27 जखमी

बारामती \ कोल्हापूर : इचलकरंजी शहरातील खासगी क्लासच्या सहलीसाठी गेलेल्या मुलींच्या बसला बारामती- फलटण मार्गावर अपघात झाल्याने चालकासह 3 मुली गंभीर जखमी झाल्या आहे. दरम्यान, 24 मुली व स्टाफ सदस्य किरकोळ जखमी झाले आहेत विद्यार्थिनींच्या सहलीची बस पुलावरून खाली जाऊन हा अपघात झाला. . या सर्व विद्यार्थिनींची तब्येत चांगली आहे .
इचलकरंजीतील सागर क्लासमधील ८ वी ते १० वीच्या मुलींची औरंगाबाद,दौलताबाद,वेऊळ,शिर्डी,शनी शिंगणापूर या ठिकाणी सहलीचे आयोजन करण्यात आले होते. शिर्डीवरून इचलकरंजीला परतीचा प्रवास करताना बारामती तालुक्यातील पाहुणेवाडीत अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, जखमी मुलींसह चालक व पाच स्टाफ मेंबर यांना स्थानिक रहिवासी व पोलिसांच्या मदतीने रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी बारामती येथील शासकीय महिला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या दरम्यान हा अपघातात झाला. बारामती मार्गे फलटणच्या दिशेने जाताना समोरून आलेल्या वाहनाला चुकवीताना बसच्या चालकाच्या डोळ्यावर समोर येणाऱ्या वाहनाचा प्रकाश पडल्याने अंदाज आला नाही.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच आमदार रोहित पवार यांनी जखमींची भेट घेऊन विचारपूस केली आणि डॉक्टरांशी चर्चा केली. या विद्यार्थिनींना चांगले उपचार देण्याच्या सूचना अजितदादा आणि सुप्रिया ताईंनीही दिल्या आहेत दरम्यान, खासगी क्लासने आयोजित केलेल्या मुलींच्या सहलींच्या बसला अपघात झाल्याचे समजताच पालकांची भंबेरी उडाली. पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. त्यानंतर घरी माहिती मिळताच पालकांनी तातडीने बारामतीकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच सागर क्लासेसच्या बाहेर मोठी गर्दी पालकांनी केली होती.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…