no images were found
उत्कृष्ट संसाधन व्यक्तींसह सर्वोत्तम STUTI कार्यक्रम: प्रा. सोनकवडे
“करदात्यांची रक्कम पारदर्शक ठेवून निधी देणार्या संस्थेला योग्य चित्र दिसले पाहिजे.” असे मत केरळ विद्यापीठाचे माननीय प्र कुलगुरू टी. पी. अजयकुमार, यांनी केरळ विद्यापीठातील स्तुति प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी व्यक्त केले. या प्रसंगी केरळ विद्यापीठाचे माननीय प्र कुलगुरू टी. पी. अजयकुमार, यांच्यासह, सिंडिकेट सदस्य के. जी. गोपचंद्रन, स्तुति चे समन्वयक, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर चे प्रा. आर. जी. सोनकवडे, आणि विद्यापीठातील इतर प्राध्यापक उपस्थित होते.
भारत सरकारचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय (DST) प्रायोजित, स्तुति (सिनरजिस्टिक ट्रेनिंग प्रोग्रॅम अँड टेक्नॉलॉजिकल इन्फ्रास्ट्रक्चर) योजनेअंतर्गत केरळ विद्यापीठाच्या उपकरणे आणि सुविधेसाठी असणाऱ्या केंद्रीय प्रयोगशाळा (CLIF) आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ७ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन १० ते १६ ऑक्टोबर २०२२ दरम्यान केले होते. प्रा. आर. जी. सोनकवडे यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण भारतामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यापैकी अनेक आय आय टी, केंद्रीय विद्यापीठ तसेच विविध संस्थांमध्ये स्तुति कार्यक्रम आयोजित केले होते. हा त्यापैकी आठवा कार्यक्रम होता.
या कार्यशाळेचा समारोप समारंभ १६ ऑक्टोबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी काही सहभागींनी त्यांचा अभिप्राय देखील व्यक्त केला. सर्वोत्तम झालेला स्तुति प्रशिक्षण कार्यक्रम आणि त्यामधील प्राध्यापक सोनकवडे यांची दोन्ही व्याख्याने तांत्रिक माहिती पूर्ण होती.
सन्माननीय प्रमुख पाहुणे, टी. पी. अजयकुमार यांनी भारत सरकारचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचे विशेष आभार मानले त्याचबरोबर प्रा. आर.जी. सोनकवडे आणि शिवाजी विद्यापीठाचे देखील मनापासून आभार मानत केरळ विद्यापीठाच्या CLIF केंद्राचे हा कार्यक्रम अतिशय उत्तम रीतीने आयोजित केल्याबद्दल कौतुक केले.
प्रा. जी. एम. नायर यांनी या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी, संपूर्ण आठवडाभराच्या कार्यक्रमाचा आढावा घेत शिवाजी विद्यापीठाचे आभार मानले. केरळ विद्यापीठाला NAAC ची A++ ग्रेड मिळण्यामध्ये CLIF केंद्राचा खूप मोठा हातभार आहे असे देखील त्यांनी नमूद केले.
CLIF केंद्राचे संयुक्त संचालक डॉ. जी. सुबोध यांनी सर्व सहभागी तसेच केरळ विद्यापीठातील प्राध्यापकांच्या उत्साह पूर्ण सहभागाबद्दल त्यांचे कौतुक केले.
केरळ विद्यापीठाच्या सर्व मान्यवर व त्यांनी याप्रसंगी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय तसेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर च्या कुलगुरू प्र कुलगुरू आणि व्यवस्थापकीय परिषदेचे आभार मानले. प्रा. सोनकवडे यांनी केलेल्या परिश्रमाचे कौतुक करत हा कार्यक्रम केरळ विद्यापीठाच्या CLIF केंद्राला दिल्याबद्दल मनापासून आभार मानले.
स्तुति चे स्थानिक समन्वयक प्रा. सॅम सालोमन यांनी सहभागी व्यक्तींची मर्यादा जरी 30 असली तरीही केरळ मधील 40 आणि केरळच्या बाहेरचे 40 संशोधक विद्यार्थ्यांना या कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेतले गेले. यामुळे केरळ बाहेरील सहभागींना केरळ विद्यापीठाचे एक विस्तृत दृश्य अनुभवायला मिळाले असे मत व्यक्त करत आभार प्रदर्शन केले.