Home सामाजिक पाटील काकीने शार्क टँक इंडिया २ मध्‍ये सर्वांचे मन जिंकले

पाटील काकीने शार्क टँक इंडिया २ मध्‍ये सर्वांचे मन जिंकले

1 min read
0
0
44

no images were found

पाटील काकीने शार्क टँक इंडिया २ मध्‍ये सर्वांचे मन जिंकले

जगभरातील व्‍यक्‍तींसाठी महामारी आव्‍हानात्‍मक काळ राहिला असताना त्‍यामधून अनेक व्‍यवसाय विचारांना चालना देखील मिळाली आहे. पाटील काकी ही महामारीदरम्‍यान सुरू झालेली कंपनी आहे, जी शार्क टँक इंडिया २ मध्‍ये दिसणार आहे. उल्‍लेखनीय व्‍यवसाय संकल्‍पनेमुळे शार्क्‍सचे घरगुती स्‍नॅक ब्रॅण्‍डकडे लक्ष वेधले गेले.

शार्क्‍स पाटील काकी म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या गीता गोविंद पाटील यांची प्रगती पाहून अचंबित झाले. त्‍यांनी लोकांना जेवण देण्‍याप्रती आवडीला घरगुती स्‍नॅक्‍सची विक्री करणा-या यशस्‍वी कंपनीमध्‍ये रूपांतरित केले. मुंबईमध्‍ये राहणा-या पाटील काकी यांना त्‍यांचा २१ वर्षाचा मुलगा विनित आणि दर्शिल अनिल सावला यांचे साह्य मिळाले. तरूण व्‍यवसाय विचारवंतांनी पाटील काकींना त्‍यांचा व्‍यवसाय वाढवण्‍यासाठी आणि त्‍यांच्‍या ग्राहकांच्‍या गरजा समजून घेण्‍यासाठीचे धोरण आखले. संपूर्ण लॉकडाऊनदरम्‍यान विनीत व दर्शिलने पाटील काकींना मसाले पाठवण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासोबत कंपनीला नाव देण्‍यामध्‍ये आणि २०,००० समर्पित ग्राहक मिळवून देण्‍यामध्‍ये देखील मदत केली. घरगुती स्‍वादिष्‍ट पदार्थांचा आस्‍वाद घेण्‍यासोबत शार्क्‍स विनीतची अद्वितीय मार्केटिंग व कोडिंग क्षमता पाहून भारावून गेले. ज्‍यामुळे अनुपम मित्तल यांनी विनीतला ‘नये भारत के उभरते चेहरे’ अशी उपमा दिली. फक्‍त एवढेच नाही या आई-मुलाच्‍या जोडीला ऑल-शार्क डील देखील मिळाली. शार्क्‍सच्‍या पॅनेलने फासे फिरवले आणि पाटील काकीकडे डील ऑफर केली. २.५ टक्‍के इक्विटीसाठी ४० लाख रूपयांच्‍या मागणीसह काकी करारावर शिक्कामोर्तब करण्यासाठी कोणता शार्क निवडेल? पहा एपिसोड फकत सोनी एंटरटेन्‍मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्‍हवर.

या पिचमधील पॅनेलमध्‍ये अनुपम मित्तल (Shaadi.com – पीपल ग्रुपचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी), अमन गुप्‍ता (बोटचे सह-संस्‍थापक व सीएमओ), विनीता सिंग (शुगर कॉस्‍मेटिक्‍सच्‍या सह-संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी) आणि पियुष बंसल (Lenskart.com)चे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी) यांचा समावेश होता.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

प्रिया ठाकूरची अविस्मरणीय जयपूर डायरीज

प्रिया ठाकूरची अविस्मरणीय जयपूर डायरीज झी टीव्हीवरील ‘वसुधा’ ही मालिका आपल्या भावनिक आणि र…