Home क्राईम अल्पवयीन मुलीने प्रियकराच्या मदतीने धारदार शस्त्राने वार करुन आईचा खून

अल्पवयीन मुलीने प्रियकराच्या मदतीने धारदार शस्त्राने वार करुन आईचा खून

0 second read
0
0
148

no images were found

अल्पवयीन मुलीने प्रियकराच्या मदतीने धारदार शस्त्राने वार करुन आईचा खून

ठाणे : आई आपल्या प्रेम प्रकरणावरुन सतत विरोध करत असल्याच्या रागातून एका अल्पवयीन मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने धारदार शस्त्राने वार करुन तिचा खून केल्याचा आरोप आहे. मुंब्रा परिसरातील आंबेडकर नगर येथील फातिमा हाईट्स या इमारतीत राहणाऱ्या एका तरुणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने आईची हत्या केली. हत्येनंतर मुलगी आणि तिचा प्रियकर हे दोघेही पसार झाले आहेत. मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
आपल्या १७ वर्षीय मुलीचे एका तरुणासोबत प्रेम संबंध असल्याचे आईला समजले. त्यानंतर आपल्या मुलीच्या भविष्याचा विचार करून आईने प्रियकरासोबत असलेल्या नात्यावरून तिला वारंवार टोकण्यास सुरुवात केली. त्याच रागातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सबा मेहंदी हाश्मी असे मृत्यू झालेल्या आईचे नाव आहे. हत्या करणारी अल्पवयीन मुलगी आणि तिचा प्रियकर हे दोघेही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सबा यांच्या जवळच्या नातेवाईकांनी त्यांना फोन केला असता त्यांचा फोन बंद लागत होता. त्यानंतर नातेवाईकाने मुलीला फोन केला, मात्र तिच्याकडूनही कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकाला संशय आला आणि त्यांनी सबा यांच्या राहत्या घरी धाव घेतली.
घराला बाहेरून कुलूप होते आणि घराच्या आतून फोनच्या रिंगचा आवाज येत असल्याने नातेवाईकांचा संशय बळावला आणि त्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी सबा या रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत जमिनीवर पडल्या होत्या त्यानंतर या हत्येचा उलगडा झाला. यावेळी सबा यांच्या मानेवर, गळ्यावर, छातीवर धारदार सुरीने वार करून त्त्यांना जीवे ठार मारल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…